Sunday, 23 April 2023

जैवविविधतेची संकल्पना व जैवविविधतेचे प्रकार Concept and Types of Biodiversity

 


जैवविविधतेची संकल्पना व जैवविविधतेचे प्रकार  

Concept and Types of Biodiversity

समुदाय आणि परिसंस्थांच्या कार्याशी आणि स्थिरतेशी अतिशय घनिष्ठपणे जैवविविधता निगडित असते . मानवाच्या अनेक दृष्टिकोनांमधून ते अत्यंत महत्वाचे आहे . जैवविविधता आर्थिकदृ ष्टयाही महत्वाची आहे . कारण अन्न , वस्त्र , निवारा , औषधे आणि काही प्रमुख उदयोगधंदयांना मूलभूत कच्च्या मालाचा पूरवठा जैवविविधतेद्वारा होतो . जेम्स लव्हलॉक यांच्या मतानुसार आपली पृथ्वी ही सजीव असून ती एखदया महाकाय प्राण्याप्रमाणे काम करते . खरे तर पृथ्वी म्हणजे एक विशालकाय अशी परिसंस्था आहे . म्हणूनच पृथ्वीला जैवविविधतेचे भांडार म्हणून ओळखले जाते .

परिसंस्थेतील वनस्पती , प्राणी , आणि सुक्ष्मजीव यांच्या प्रजातीच्या एकंदर प्रमाणाला जैवविविधता म्हणतात . विविध प्रकारची जैवविविधता पृथ्वीच्या पृष्ठभागावर अस्तित्वात असलेली बघायला मिळते . पृथ्वीवर मोठया प्रमाणात जैवविविधता असल्यामुळे वनस्पतीच्या विविधतेत सुधदा सधनता दिसून येते . जगातील अनेक देशांना जैवविविधता ही वरदान ठेरलेली आहे . जैवविविधतेत वनस्पती , प्राणी , पशू पक्षी आणि सुक्ष्मजीवांच्या प्रजातीची संख्या विपुल प्रमाणात असल्यामुळे त्या प्रदेशाच्या विकासाला मोठी संधी प्राप्त होते . म्हणूनच पर्यावरण - परिसंस्थेच्या अस्तित्वासाठी आणि मानवाच्या विकासासाठी जैवविविधता महत्वाची असते . कॅनडा , ब्रिटिश कोलंबिया , ब्रॉझील मधील अॅमेझॉन खोरे , पेन्टानॉल नमभूमी , पेरु , बोलीव्हिया , कॅमेरुन , घाना , रवांडा , युगांडा , केनिया , कांगो , भारत , नेपाळ , भूतान , श्रीलंका , थायलंड , जावा , सुमात्रा , बोर्निओ , फिलीपाईन्स , न्यूझिलँड , पापुआ न्युगिनी , ऑस्ट्रेलिया , टास्मानिया इत्यादी देशात विपुल प्रमाणात जैवविविधता आढळते . शास्त्रज्ञांच्या मतानुसार भारत देश जैवविविधतेच्या सामर्थ्यावर जागतिक महासत्ता बनू शकते . हे जरी खरे असले तरी हे होणे शक्य नाही कारण भारततील जैवविविधतेच्या बाबतीत केले जाणारे चुकीचे व्यवस्थापन होय जागतिक शास्त्रज्ञांच्या अहवालानुसार सद्दःस्थितीत पृथ्वीवर ०१ ते ०५ कोटी सजीवांच्या जाती आहेत .

लाखो वर्षाच्या उत्क्रांतीनंतर या संपूर्ण जाती उदयाला आलेल्या आहेत . या संपूर्ण जातीचे मानवी जीवनाच्या विकासात अनन्यसाधारण महत्व आहे . याच्याशिवाय मानवाच्या अस्तित्वाचा आपण विचारही करु शकत नाही . परंतु अलिकडील काळात विविध कारणाने यांचा प्रचंड प्रमाणात नाश झालेला आहे . काही जाती कायमच्या नामशेष झाल्या तर काही नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत . मानवाने आपल्या तात्पुरत्या गरजा भागविण्याठी आणि क्षणिक सुखासाठी जैवविविधतेचा नाश केला आहे . अर्थ आणि व्याख्याः पृथ्वीतळावर असणाऱ्या जीवामधील विविधतेलाच जैवविविधता असे म्हणतात . ' जैवविविधता ' या संकल्पनेत ' विविधता आणि परिवर्तन सामावलेले आहे . इ.स. १ ९ ८६ मध्ये अमेरिकेतील एका परिषदेत सर्वप्रथम जैवविविधता ही संज्ञा वापरली गेली . हीच जैविक साधनसंपत्ती मानवाच्या आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी अत्यंत महत्वाची आहे . म्हणून भविष्यातील पिढीसाठी अमुल्य ठेवा असणाऱ्या साधनसंपत्तीची जपवणूक किंवा संवर्धन करण्यासाठी UNEP- United Nations of Envinronmental programme या जागतिक संशोधन संस्थेने १ ९ ८८ मध्ये जैवविविधते बाबत आंतरराष्ट्रीय कराराच्या संदर्भात कृती गट स्थापन केला . १ ९९ २ मध्ये नैरोबी येथे आयोजीत केलेल्या परिषदेत या कृती गटाने जैवविविधता कराराच्या संदर्भाने तयार केलेला मसुदा स्वीकारण्यात आला . ५ जून १ ९९ २ मध्ये ब्रॉझीलची राजधानी असलेल्या रियो दि जेनेरो या शहरात आयोजित केलेल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या “ पर्यावरण आणि विकास परिषद ” अर्थात “ वसुंधरा परिषद ” मध्ये वरील करार हस्ताक्षरासाठी ( Signature ) ठेवण्यात आला . जून १ ९९ ३ अखेर पर्यंत जगातील १६८ देशांनी यावर स्वाक्षरी केली आणि २ ९ डिसेंबर १ ९९ ३ मध्ये हा करार अंमलात आला . १ ९९ ४ मध्ये सदस्य राष्ट्रांची पहिली शिखर परिषद बहामास येथे आयोजित कारण्यात आली . हा करार जागतिक समुदायाच्या शाश्वत विकासाच्या प्रयत्नातून प्रेरित झाला आहे . वरील परिषदेत वेळोवेळी जैवविविधता ( biodiversity ) ही संज्ञा वापरल्याची नोंद आढळते .

जैवविविधतेचे विश्लेषण करत असताना जनुके ( Genes ) , प्रजाती ( Species ) , आणि परिसंस्था ( Ecosystem ) या जीवशास्त्रीय संज्ञाचा उपयोग ओघानेच होतो . यावरुन जैवविविधता काय आहे आपल्याला समजण्यास मदत झाली आहे . जैवविविधता अधिक सुस्पष्ट समजून घेण्यासाठी खालील व्याख्या पाहवू -

व्याख्या :

१ ) वसुंधरा परिषद ( १ ९९ २ ) : “ जीवित जीवांचे सर्व स्त्रोत भूपृष्ठीय , सागरी व अन्य जलीय परिसंस्था आणि त्याचा एक भाग असलेली जटिलता / संकुलता तसेच जैवजातीमधील आणि परिसंस्थेतील विविधता यांचा समावेश म्हणजे जैवविविधता होय . "

२ ) वॉल्टर डी . रोसेन : “ परिसंस्थेतील भिन्न जातींचा व भिन्न संस्थेचा सजीवाचे एकत्रीकरण म्हणजे जैव विविधता होय "

३ ) जागतिक साधनसंपत्ती संस्था : जागतिक जीवांच्या विविधेत त्यांच्या जननिक / आनुवंशिक विविधता आणि त्यांच्या विविध गटांचे एकत्रीकरण यांचा समावेश म्हणजे जैवविविधता होय . मानवी जीवन व त्याच्या क्षेत्र कुशलतेला नैसर्गिक जीवशास्त्रीय बहुमुल्य ठेवा घट्ट विणतो हे जैवविविधतेच्या संज्ञेत सर्वसमावेशक असते . संकल्पनेचा विस्तार जनुक ( वंशिकता ठरविणारा पेशीमधील घटक ) , जैवजाती आणि परिसंस्थेच्या आंतर सुसंबध्दतेवर प्रकाश टाकतो . कारण जैवजातीचे घटक जनुक आहेत आणि परिसंस्थेचे घटक जैवजाती आहेत . या श्रेणिबंध रचनेच्या कोणत्याही पातळीवर बदल झाल्यास दुसन्यामध्येही बदल होण्याची शक्यता असते . थोडक्यात , जैवविविधतेच्या केंद्रबिंदू जैवजाती आहे . "

४ ) " पृथ्वीवरील एकूण अधिवास आणि त्या अधिवासात आढळणाऱ्या प्राण्यांचा एकूण प्रजातींना जैवविविधता असे म्हणतात " ५ ) “ पृथ्वीवरील विविध जीव , प्राणी , वनस्पती आणि त्यांचे वस्तीस्थान यांच्यातील परस्पर संबंधाच्या अभ्यासाला जैव विविधता असे म्हणतात "

६ ) " विविध परिसंस्थेमधील प्राण्यांमध्ये जी विविधता आढळते तिला जैवविविधता असे म्हणतात .

" जैवविविधतेच्या श्रेणी पातळया / जैवविविधतेचे प्रकार :

जैवविविधतेच्या पुढील तीन श्रेणी पातळया आहेत :

१ ) जननिक / आनुवंशिक / गुणसुत्रीय विविधता २ ) जातीय विविधता ३) परिसंस्थीय विविधता

१ ) जननिक / आनुवंशिक / गुणसुत्रीय विविधता ( Genetic Diversity )

“ एखादया जातींमध्ये अनेक प्रकार असतात की , त्यांचा आकार , विस्तारमान , रोगांना प्रतिकार करण्याची क्षमता अशा गुणवैशिष्ट्यांत अल्प प्रमाणात फरक असतो आणि विपरीत पर्यावरण स्थितीमध्ये जगण्याचा काटकपणा असतो , याला जननिक विविधता असे म्हणतात " उदाहरणार्थ , तांदळाच्या वन्य आणि लागवड होणाऱ्यांमध्ये हजारो प्रकार असतात की , जन निक पातळीवर वेगवेगळी रुपे दर्शवितात . तसेच त्यांचा रंग , आकार , विस्तारमान , वास आणि पोषण मूल्यांमध्ये फरक असतो , याला ' तांदळाची जननिक विविधता ' असे म्हणतात . विशिष्ट जनुकखंडाचा केंद्रिभूत अनुक्रम , गुणसूत्र संख्या व सूरचित जनुकांमधील जोडणी इत्यादर्दीमधील परिवर्तनामुळे जननिक विविधता आढळते . उत्क्रांती बदलासाठी संधी , जातींचे टिकून , राहणे आणि नवीन निर्मिती हा जननिक विविधतेच्या कार्याचा एक भाग असतो . विशिष्ट भौगोलिक प्रदेशात विशिष्ट जातीचे सजीव आढळतात . यात एखादया विशिष्ट प्रदेशातील निरनिराळ्या प्रकारचे पक्षी , प्राणी , मासे , कीटक इत्यादीचा समावेश होतो . एका ठराविक प्रकारच्या विविध जातीमधील विवि ही ठराविक जातीमधील विविधता म्हणून ओळखली जाते . उदा पक्ष्यांचे विविध प्रकार , प्राणी , मासे , कीटक , बेडूक इत्यादी .

२ ) जातीय विविधता ( Species Diversity ) “ परिसंस्थेतील जातींच्या सुसंपन्नतेला जातीय विविधता म्हणतात . " जवित सजीवांच्या वर्गीकरणासाठी आधुनिक प्राणालीमध्ये मूलभूत आणि सर्वात महत्वाच्या एकक जाती आहेत . पृथ्वीवर जातींची संख्या अगणित आहे . जातींमुळे वर्गीकरण विज्ञानाची जटिलता निर्माण होते . सजीवांच्या चढत्या क्रमाने अनुक्रम पुढीलप्रमाणे आहे .

अ ) जाती : वनस्पती व प्राणी यांच्यातील सर्वात लहान एकक

ब ) प्रजाती समान जाती मिळून प्रजाती तयार होते . भिन्न व संबंधित जातींचा संघ म्हणजे प्रजाती .

क ) कुले : समान प्रजातीपासून कुळे तयार होतात .

ड ) वर्ग / वर्गीकरण : शारीरिक , जैव रासायनिक व इतर संबंधाच्या आधारे सजीवांच्या रचनेची श्रेणी

ई ) कोटी / संच : सजीवांच्या वर्गीकरणात प्राणी किंवा वनस्पती यापैकी कोणत्याही एका प्रकारच्या व्यक्तींचा सर्वात संच दर्शविणारी संज्ञा सजीवांच्या वर्गीकरणाचा हा उच्चतम प्रवर्ग आहे .

सर्वसाधारणपणे कोटी संच पाच आहेत :

१ ) प्राणी ( Animal )

२ ) वनस्पती ( Plant )

३ ) कवक / बुरशी ( Fungi )

४ ) शैवाल ( Protist / Algae ) आणि

५ ) सुक्ष्मा जंतू ( Prokaryotes / Bacteria )

अधिक विविधतेसाठी प्रत्येक जातीच्या समुदायात इतरांपेक्षा व्यक्तिगत स्तरावर एकसारखी विपुलता असावी लागते , तर एका जातीच्या समुदायात बहुतेक सर्व व्यक्तिगत स्वरुपात असल्यास किमान विविधता असते . आतापर्यंत जागतिक स्तरावर सुमारे १.७ दशलक्ष जातींची ओळख पटलेली आहे . पृथ्वीवर एकूण जातींची संख्या ५ ते १०० दशलक्ष असावी असा अंदाज आहे . साध्या शैवाळापासून ते महाकाय वृक्षापर्यंत असंख्य प्रकारच्या वनस्पतीही आढळतात . तसेच गाय , बैल , शेळी , घोडा , हत्ती , वाघ , कुत्रा , मांजर , हरीण असे अनेक प्रकारचे प्राणी प्रकार आढळतात . या सर्वांना प्रजाती विविधता म्हणून ओळखले जाते .

( ३ ) परिसंस्था विविधता ( Ecosystem Diversity ) :

( Ecosystm diversity relates to variety of habitats bie communities and ecological process in the biosphere and is considered as complex level of diversity ) " जीवावरणात निवासक्षेत्रे / अधिवास , जैविक समुदाय आणि पारिस्थितिकी प्रक्रियेच्या विविध प्रकारास परिसंस्था विविधता म्हणतात की , ज्यामध्ये विविधतेची जटिल पातळी असते . " परिसंस्था विविधतेचे सर्वसाधारणपणे जागतिक किंवा खंडानुसार वितरण किंवा परिसंस्थेमधील जातीय विविधतेनुसार पारखले जाते . जातीय परिसंस्थेमध्ये विशिष्ट गटाची सुसंपन्नता आणि त्याच्या सापेक्ष विपुलतेचे मूल्यमापन यांचा समावेश होतो . जातीय घटकात साधारण समान स्वरुपाची विपुलता असल्यास प्रणालींमध्ये अधिक विविधता आढळते . पृथ्वीपृष्ठावर गवताळ प्रदेश , वने , वाळवंटे अशा विविध प्रदेशात वैशिष्टयेपूर्ण परिसंस्था आढळतात . त्याचप्रमाणे पाण्यातील परिसंस्थामध्ये गोडयापाण्यातील परिसंस्था व खाऱ्या पाण्यातील परिसंस्था या वेगवेगळया स्वरुपात आढळतात .

No comments:

Post a Comment

  भरती परीकल्पना              सर जेम्स जीन्स या ब्रिटीश शास्त्रज्ञाने 1919 मध्ये पृथ्वीच्या उत्पत्तीचे स्पष्टीकरण देण्यासाठी त्यांचे ' ट...