Sunday, 23 April 2023

जैवविविधतेच्या -हासाची कारणे Causes of biodiversity loss

 

 जैवविविधतेच्या -हासाची कारणे  

Causes of biodiversity loss



मानवाच्या अन्न , वस्त्र , निवारा यांसारख्या मूलभूत गरजां या पूर्णतः निसर्गावर अवलंबून आहेत . शिवाय , व्यवसायासाठी लागणारा कच्चा माल , औषधी इ . अनेक कारणांसाठी मानव अनादीकाळापासून मानव निसर्गावर अवलंबून असलेला दिसून येतो . म्हणूनच पृथ्वीवरील सजीवांचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी आणि पर्यावरणाचा शाश्वत विकास घडवून आणण्यासाठी पर्यावरणातील जैवविविधता समृध्द ठेवणे आवश्यक आहे . पर्यावरणातील सजीवांच्या विविध जातीमधील प्राण्याच्या किंवा जातींचा नाश होणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे . अशा नाश झालेल्या सजीवांची जागा उत्क्रांत झालेले नवीन सजीव घेत असतात . सर्व साधारणपणे नैसर्गिक परिसंस्थेतील एका दशकांत एका जातीचे सजीव नष्ट होतात . परंतु आज मानवाच्या हस्तक्षेपामुळे दुर्दैवाने यात वाढ झालेली आहे . त्यामुळे दरवर्षी हजारो जाती नाश होऊ लागल्या आहेत . काही जाती तर मानवाला अवगत होण्याअगोदर नाश होऊ लागल्या आहेत . याला वेळीच आळा घातला गेला नाहीतर असंख्य प्राणी , वनस्पती , कीटक , सुक्ष्मजीव यांच्यावर विपरित परिणाम होऊन जैवविविधता धोक्यात येते .

जैवविविधतेचा -हास प्रामुख्याने पुढील दोन कारणामुळे होतो- 

१ ) नैसर्गिक २ ) मानव निर्मित 

१ ) नैसर्गिक कारणे ( Natural Causes ) :

        सजीवांच्या जिवाश्मांच्या ( Fossils ) एक अभ्यासवरुन असे लक्षात आले आहे की , पृथ्वीवर उदयास अलेल्या सजीवांच्या जातीपैकी जवळजवळ ९९ टक्के जाती या मानवाची उत्पत्ती होण्याअगोदर म्हणजे नैसर्गिक कारणाने नष्ट झालेल्या आहेत . एका ठराविक काळात झालेल्या हवामान परिवर्तनामुळे या जाती नष्ट झालेल्या आहेत . हे हवामान परिवर्तन कोणत्या कारणामुळे झाले आसावे या बाबत एकमत नाही . कदाचित प्रचंड मोठा उल्कापात होऊन पृथ्वीवरील हवामान बदल झाला असावा . पृथ्वीचे सरासरी तापमान कमी होऊन सागर पातळीतही बदल झाला असावा . हा बदल उष्ण कटिबंधातील सजीवांना सहन न झाल्यामुळे ते नष्ट झाले असावेत . त्याच प्रमाणे अनेक नैसर्गिक कारणे उदा . भूकंप , ज्वालामुखी , महापूर , वादळे , वणवा दुष्काळ , त्सुनामी इत्यादी कारणांमुळे सजीवांचा संहार झाला आसावा .

 २ ) मानव निर्मित कारणे ( Man made Causes ) : 

        लोकसंख्या वाढ हे यामागचे प्रमुख कारण आहे . या वाढत्या लोकसंख्येच्या अन्न , वस्त्र निवारा , इंधन , चारा , लाकूड इत्यादी गरजा भागवण्यासाठी मानवाचा पर्यावरणात हस्तक्षेप वाढत गेल् आहे . तसेच बऱ्या वेळी दुसऱ्या प्रदेशातील वनस्पती जाणूनबुजून किंवा अजाणतेपणी आपल्या प्रदेशान आणल्या जातात . त्याचा विपरित परिणाम तेथील मूळ वनस्पतीवर होऊन वनस्पतीच्या मूळ जाती नष् होतात . उदा . यु.एस.ए. मधील गव्हाबरोबर भारतात आलेले गाजर गवत ( काँग्रेस गवत ) हे अजानतेपण आणलेली वनस्पती . या वनस्पतीमुळे स्थानिक वनस्पती नष्ट झालेल्या दिसून येतात . तर केरळ आणि कर्नाटक राज्यात निलगिरी वृक्षांची लागवड करण्यासाठी मूळच्या वनस्पती तोडण्यात आल्या .

१ ) शिकारः 

            मानवाच्या अन्न या गरजेबरोबर अनेक इतरही गरजा प्राण्यांकडून भागवल्या जातात . उदा . दुध , मांस , कातडी , हाडे व इतर भाग औषधीसाठी वापरले जातात . या कारणास्तव प्राण्यांची शिकार मोठया प्रमाणावर केली जाते . प्रतिष्ठेसाठी प्राण्यांचा वापर केला जातो . शिकारीवर कायदयाने बंदी असूनही अनेक ठिकाणी मोठया प्रमाणात पक्षी व प्राण्यांची शिकार केली जाते . एका सर्वेक्षण अहवालानुसार एकटया चिल्का सरोवराच्या परिसरात प्रतिवर्षी जवळजवळ १५ ते २० हजार जलपक्षी मारले जातात . त्यामुळे अनेक पक्ष्यांच्या व प्राण्याच्या जाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत .

 २ ) मासेमारी व जलशेती : 

            माशांचा अन्न म्हणून वापर केला जातो . त्यामुळे जगातील अनेक भागात मोठया प्रमाणात मासेमारी केली जाते . त्यामुळे तेथील माशांचे प्रमाण खूपच कमी झालेले आहे . आधुनिक तंत्रज्ञान व बोटी यामुळे मासेमारीत आधुनिकता आलेली असल्याने मोठ्या प्रमाणात मासेमारी केली जाऊन माशांचे प्रमाण झपाटयाने घटत चालेले आहे . मोठे ट्रॉलर या आधुनिक जाळयांच्या राहायाने समुद्र तळही खरडून काढला जात आहे . त्यामुळे तेथील संपूर्ण परिसंस्था उध्वस्त होते . यात छोटे मासे किंवा निरुपयोगी जलचर विनाकारण मारले जातात . अटलांटिक समुद्रातील कॉड माशांचे प्रमाण खूप कमी झालेले आहे . 

३ ) परिसर संहारः 

           ज्या परिसरात मानवी हस्तक्षेप होतो , त्या परिसरातील परिसंस्थेला धोका निर्माण होत असतो . एखादया वनाच्छादित प्रदेशातून रस्ता गेला तर तेथून रहदारी सुरु होते आणि प्रदुषणाचे प्रमाण वाढते तसेच सागरी वाहनांच्या आवाजामुळे प्राणी व पक्षी दूर जातात , त्यांचा अधिवास नष्ट होतो . तसेच सागरी किनारी भागावर भर टाकल्याने तेथील वनांची क्षेत्रे नष्ट होतात आणि तेथील नैसर्गिक परिसंस्था धोक्यात येते . 

४ ) व्यापारी उत्पादने आणि सजीवांचा व्यापारः      

               निसर्गातून अनेक प्रकारची व्यापारी उत्पादने मिळतात . तंत्रज्ञानातील प्रगती , मानवी शोध यामुळे या उत्पादनाचे व्यापारी महत्व वाढते . परंतु अनेक प्रकारच्या प्राणी , पक्षी , वनस्पती यांच्या व्यापारावर बंदी असूनही या व्यापारातून भरमसाठ आर्थिक फायदा असल्यामुळे मोठया प्रमाणात प्राण्यांची व वनस्पतीची तस्करी केली जाते . चोरटया मार्गानी प्राण्यांची कातडी , हाडे , शिंग याची निर्यात केली जाते . यासाठी अनेक प्राण्यांची , पक्ष्यांची अतिशय क्रूरतेने हत्या केली जाते . त्यामुळे पर्यावरणातील इतर घटकांचाही विनाश होतो आणि तेथील परिसंस्था धोक्यात येते . जगात विकसनशील आणि अविकसनशील राष्ट्रांतून अशा प्रकारची तस्करी मोठया प्रमाणात चालते . 

५ ) आजारः 

             प्राण्यांना किंवा वनस्पतींना होणाऱ्या विशिष्ट प्रकारच्या आजारामुळे त्यांची संख्या कमी होत असते . १ ९ ०४ मध्ये संयुक्त संस्थानाने चिनमधून आयात केलेल्या वनस्पतीजन्य पदार्थामध्ये बुरशीचे प्रमाण आल्याने त्यानंतरच्या ४० वर्षात संयुक्त संस्थानातील चेस्टनट प्रकारची अनेक वृक्ष नष्ट झाली ..

 ६ ) पर्यावरण प्रदूषण : 

              पर्यावरणातील विषारी प्रदूषकाचा घातक परिणाम पर्यावरणातील सजीवांवर होत असतो . जल प्रदूषणामुळे सागर जलातील जलीय प्राण्यांची संख्या फार मोठ्या प्रमाणात कमी होऊ लागली आहे . अलिकडील काही वर्षांमध्ये अटलांटिक किनाऱ्यावर अनेक सिल मासे मरुन पडलेले आढळले याचे कारण महासागरात सोडले गेलेले डी.डी.टी. डिओक्लिन आणि पी.सी.बी हे विषारी घटक होत . तसेच प्रशांत महासागरातही अनेक सागरी सिंह मरण पावल्याचे आढळले आहे . शिष्यांच्या प्रदूषणाचे विपरित परिणाम अनेक सजीवांच्या जातीवर झालेले आढळतात . अशी अनेक उदाहरणे स्पष्ट दिसून येतात .

 ७ ) उपद्रवी प्राणी आणि कीटक नियंत्रकांचा वापरः

             कृषी क्षेत्रातील पिकांची नासधूस करणारे प्राणी उदा . जंगली कुत्रे , डुकरे , कोल्हे , टोळ यांसारख्या प्राण्यांच्या भीतीने त्यांना ठार मारले जाते . त्यासाठी त्यांना विष दिले जाते . अशा मध्यमातून दरवर्षी हजारो प्राणी मारले जातात . तसेच ग्रामीण किंवा शहरी भागात उपद्रवी कौटक मारण्यासाठी उदा धरातील सुरळे मारण्यासाठी ' हिटफीट ' या रासायनिक स्प्रेचा वापर केला जातो . या सर्व माध्यमातून इतर मानवाला उपयुक्त असे कीटक ही मारले जातात .

 ८ ) नवीन सजीवांची आयातः

            जगाच्या विविध क्षेत्रात विविध प्रकारच्या सजीवांच्या जाती आढळतात . त्या तेथील परिसंस्थेचे घटक असतात . तेथील अन्न साखळीतील त्यांची संख्याही मर्यादीत असते . परंतु एखादया दुसऱ्या प्रदेशातील वनस्पती किंवा प्राणी जाती आयात केल्या जातात . त्यावेळी त्या नवीन जातीची भरमसाठ वाढ होते . कारण त्या नवीन प्रजातीवर इतर सजीव घटकांचे नियंत्रण नसते . उदा . भारतात घाणेरी नावाची वनस्पती बागेमध्ये शोभेचे वृक्ष म्हणून आयात केली होती , परंतु तिने आज आपले वर्चस्व स्थापित केले आहे . तसेच युरोपातील वसाहतकर्त्यांनी आपल्या सोबत कुत्रे , डूकरे व माजरे मॉरिशस मध्ये युरोपातील घेऊन गेल्याने तेथील डोडो नावाचा पक्षी नामशेष झाल्याचे आढळते . अशा प्रकारे वरील नैसर्गिक आणि मानव निर्मित कारणामुळे पृथ्वी पृष्ठभागावरील जैव विविधता धोक्यात येऊन अनेक जीव नष्ट झालेले आहेत तर काही जीव धोक्यात आल्याचे आढळून येते त्यासाठी वेळीच उपाययोजना करणे आवश्यक आहे .

No comments:

Post a Comment

  भरती परीकल्पना              सर जेम्स जीन्स या ब्रिटीश शास्त्रज्ञाने 1919 मध्ये पृथ्वीच्या उत्पत्तीचे स्पष्टीकरण देण्यासाठी त्यांचे ' ट...