Sunday, 23 April 2023

परिसंस्था म्हणजे काय ? परिसंस्थेची रचना , प्रकार आणि कार्य . What is Ecosystem the structure Type and Function of an Ecosystem

  परिसंस्था म्हणजे काय ? परिसंस्थेची रचना , प्रकार आणि कार्य

What is Ecosystem the structure Type and Function of an Ecosystem.

जैविक पर्यावरण आणि प्राकृतिक पर्यावरण यांच्यात घनिष्ठ परस्परसंबंध असतो हे दोन्ही घटक प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या एकमेकांना प्रभावित करत असतात . वनस्पती सूर्यप्रकाशाच्या सानिध्यात पर्यावरणीय घटकांपासून स्वत : चे अन्न तयार करते . याच अन्नावर संपूर्ण जीवसृष्टी अवलंबून असते . काही प्राण्यांचे जीवनचक्र वनस्पतीवर अवलंबून असते . तर काही प्राणी हे शकाहारी प्राण्यांना आपले अन्न बनवत असतात . प्राण्यांचा एम वर्ग या प्राण्यांच्या मृत अवशेषांवर उपजिविका करतो . या भक्षण क्रियांच्या माध्यमातून वनस्पतीद्वारा संश्लेषित ऊर्जा ही रासायनिक ऊर्जेच्या स्वरूपात 5 एका जिवातून दुसन्या जिवाकडे सर्वामित होत असते . परंतु हे पदार्थ अपघटन क्रियानंतर पुन्हा श्वसन क्रियासाठी मृदा किंवा वातावरणात मिसळले जातात . या चक्रांना जैव - भू - रासायनिक चक्र असे म्हणतात . या क्रियांच्या माध्यमातून जैविक घटक आणि त्यांचे अजैविक पर्यावरण यांच्यात संतुलन राखले जाते . ज्यामध्ये सर्व जीव व कारक नियमबध्द कार्य करतात . जिवांच्या अशा समुदायाला पर्यावरण सहित , वैशिष्ट्यपूर्ण संबंधाच्या कारणामुळे एक एकक मानला जातो त्याला परिसंस्था म्हणतात .

       परिसंस्था या शब्दाचा वापर सर्वप्रथम टान्सले याने १ ९ ३५ मध्ये केला . परंतु या विचारधारेचे अस्तित्व फार जुने आहे . २० व्या शतकातील ६ व्या दशकामध्ये अनेक वैज्ञानिकांनी या विचारधारेचे स्वागत केले . ६ व्या दशकांच्या नंतर हा शब्द आणि ही विचारधारा जगातील परिस्थितीकी वैज्ञानिक आणि इतर वैज्ञानिकांच्या संशोधनाचा आधार बनला आहे . 

व्याख्याः 

१ ) ओडेम : " परिसंस्था हा परिस्थितीकीचा असा आधार घटक आहे ज्यामध्ये जैविक आणि अजैविक पर्यावरण एकमेकांवर प्रभाव पाडत असतात आणि पारस्पारिक आंतरक्रियाच्या माध्यमातून ऊर्जा आणि रासायनिक पदार्थाच्या निरंतर वहनातून कार्यात्मक गतिशिलता चालू ठेवतात " 

२ ) एफ . आर . फॉसबर्ग : “ एक किंवा अनेक सजीव , त्यांचे प्राकृतिक जैविक स्वरूपाचे प्रभावी पर्यावरण यांच्यातील आंतरक्रियामुळे कार्यान्वित होणारी पध्दती किंवा वैशिष्ट्ये पूर्ण प्रणाली म्हणजे परिसंस्था होय . ”

 ३ ) नेबल : “ परिसंस्था म्हणजे पृथ्वीवरील विविध वर्गीय जिवांच्या परस्पर आंतरक्रिया व त्यांचे पर्यावरण होय . " ४ ) " पृथ्वीवरील जैविक पर्यावरण आणि अजैविक पर्यावरण यांच्या आंतरक्रियातून निर्माण झालेले जे संघटन असते त्याला परिसंस्था असे म्हणतात . " 

परिसंस्थेची रचना : 





     परिसंस्थेच्या रचनेमध्ये जैविक आणि अजैविक पर्यावरणाच्या घटकांना समाविष्ट केले जाते . परिसस्थेच्या केवळ कार्यप्रणालीवर भर दिला जातो जैविक पर्यावरणामध्ये परस्पर संबंधाचा आधार अन्न हा घटक आहे . अन्न प्राप्त करण्याच्या पध्दतीवरून सजिवांचे दोन गट केले जातात . 

१ ) स्वयंपोषी 

( २ ) परपोषी

 १ ) स्वयपोषी :

  वनस्पती या स्वयंपोषी आहेत ज्या स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात . त्यासाठी . सूर्यप्रकाश आणि पर्यावरणीय घटकांची सहायता घेतात म्हणूनच त्यांना उत्पादक असेही म्हणतात .

 २ ) परपोषी : 

परपोषी हे स्वयपोषी जिवांनी निर्माण केलेल्या अन्नावर अवलंबून असतात . म्हणूनच त्यांना उपभोक्ता असेही म्हणतात . या परपोषी जिवांना पुन्हा दोन वर्गामध्ये विभागले जाते . 

अ ) बृहत उपभोक्ता

 ब ) लघु उपभोक्ता 

अ ) बृहत उपभोक्ता

     हे असे सजीव आहेत जे जीवीत वनस्पती किंवा प्राण्यांना आपले अन्न बनवतात यांना भक्षपोषी असेही म्हणतात

 ब ) लघु उपभोक्ता : 

     हे असे जीव आहेत की मृत आणि सडलेल्या कार्बनिक पदार्थावर आपले जीवन व्यतीत करतात हे परपोषी किंवा अपघटक म्हणून ओळखले जातात , बहुत उपभोक्ता किंवा भक्षपोषी प्राण्यांना त्यांच्या अन्नावरून विविध प्रकारात विभागले जाते . 

मिश्रहारी १ ) शाकाहारी २ ) मांसाहारी आणि ३ ) सर्वभक्षी प्राण्याप्रमाणेच प्राकृतिक पर्यावरणालाही तीन गटात विभागले जाते .

१ ) अकार्बनिक तत्व : 

यात नायट्रोजन , कार्बनडायक्सॉइड , कॅल्शिअम आणि फॉस्फरस इत्यादी चा समावेश होतो .

 २ ) कार्बनिक पदार्थ प्रोटीन , कार्बोहाइड्रेट , हयुमस आणि 

३ ) वातावरणीय घटक

तापमान , उष्णता , पाणी इत्यादी अकार्बनिक तत्वाचा संबंध चक्रीकरण क्रियांशी असतो आणि कार्बनिक पदार्थ जैविक आणि अजैविक घटकांमधील दुवा असतात . या कार्बनिक पदार्थावर अपघटकांचे जीवन आधारित असते . जलवायूकारक हे प्राण्यांची वाढ आणि त्यांची जीवन क्रिया यासाठी आवश्यक असतात . यामधून ऊर्जा प्रवाहीत होउन एक प्रकारचे संगठण निर्माण होण्यास मदत होते .

 परिसंस्थेचे प्रकार परिसंस्थेचे प्रामुख्याने दोन प्रकार पडतात



अ ) नैसर्गिक परिसंस्था ब ) मानवी परिसंस्था या प्रमुख प्रकारांचे उपप्रकारात वर्गीकरण केले जाते . नैसर्गिक परिसंस्थेचे मुख्य पांच उपप्रकार तर मानवी परिसंस्थेचे मुख्य तीन प्रकार पडतात ते खालील प्रमाणे 

१ ) भूपरिसंस्था : या परिसंस्थेचे पुढील तीन उपप्रकार पडतात . ते पुढीलप्रमाणे 

अ ) जंगल परिसंस्था / विषुववृत्तीय परिसंस्थाः शुष्क ते आर्द्रता हवामानाच्या प्रदेशात विविध स्वरूपात या परिसंस्था आढळतात . तापमान व आर्द्रता यानुसार परिसंस्थेतील वनस्पती व प्राणी यांच्यात विविधता आढळते . विषुववृत्तीय प्रदेशात सदाहरित वने मोठया प्रमाणात असल्याने जगातील सर्वात मोठी परिसंस्था या भागात आढळते उच्च अक्षांशीय क्षेत्रात समशितोष्ण हवामान असल्यामुळे सदाहरित सूचीपर्णी आणि पानझडी जंगलातील परिसंस्था आढळतात . येथील परिसंस्था साध्या व सरळ स्वरूपाच्या आहेत .

 ब ) गवताळ परिसंस्था : 

      पृथ्वीवरील मध्यम पावसाच्या प्रदेशात ( सरासरी २५ ते १२५ सेंमी पर्जन्य ) या परिसंस्था आढळतात . वाळवंटे आणि जंगले यांच्या मध्ये हा प्रदेश आढळतो . या परिसंस्था खंडाच्या अंतर्गत भागात येतात . कमी पर्जन्यामुळे तुरळक वनस्पती व मुबलक गवताळ प्रदेश निर्माण झालेले आहेत . उदा . प्रेअरी , डाउन्स , सुदान , स्टेप्स इत्यादी . उत्तर व दक्षिण अमेरिका , ऑस्ट्रेलिया व आफिका खंडात या परिसंस्था वैशिष्टयेपूर्ण आढळतात . 

क ) वाळवंटी परिसंस्था : वाळवंटी परिसंस्थाचे दोन उपप्रकार पडतात . 

१ ) उष्ण वाळवंटी परिसस्था 

२ ) शीत वाळवंटीय परिसंस्था या दोन्ही उपप्रकारात पाणी हा प्रमुख नियंत्रक घटक आहे .


 १ ) उष्ण वाळवंटी परिसंस्थाः साधारणत : या परिसंस्था खंडाच्या पश्चिम भागात आढळतात . वार्षिक सरासरी पर्जन्य अत्यंत कमी आढळते . तापमान जास्त असल्याने बाष्पीभवन जास्त असते . प्रतिकुल परिस्थितीमुळे हिरव्या वनस्पतीचा अभाव आढळतो . अशा हिरव्या वनस्पती फक्त पाणथळ जागीच आढळतात . बाभूळ , घायपात , झाडपे , कॅक्टस , इ . वनस्पती तर सर्प , विंचू , घुशी , उंदीर इ . प्राणी या परिसस्थेत आढळतात .

 २ ) शीत वाळवंटीय परिसंस्थाः

    ढुंडा आणि अंटाक्टिका परिसंस्था शीत वाळवटीय परिसंस्था म्हणून ओळखल्या जातात . अतिशय कमी तापमानामुळे पाणी बर्फाच्या स्वरूपात असते . अल्पकालीन उन्हाळे व दीर्घकालीन हिवाळे याचा विपरीत परिणाम येथील परिसंस्थेवर होत असतो . येथील परिसंस्था या प्रतिकुल काळात सुप्त असतात . उन्हाळयात त्या पुन्हा क्रियाशील होतात . लिचेन , नेचे , शैवाळ , सेज , स्पंज इ . वनस्पती तर मिक , मार्टीन ओटर , अस्वल , रेनडिअर , कुत्रे इ . सारखे प्राणी मर्यादीत स्वरूपात आढळतात . ही परिसंस्था पाण्याऐवजी तापमान हा घटक नियंत्रित करतो . 

२ ) जल परिसंस्था : जलपरिसंस्थेचे खालील प्रकार पडतात .

 अ ) नदी परिसंस्था ब ) तळी व सरोवर परिसंस्था क ) खाडी परिसंस्था इ ) सागर परिसंस्था 


अ ) नदी परिसंस्थाः या परिसंस्था स्थिर किंवा परिपूर्ण नसतात कारण नदीचे पाणी सतत प्रवाही असते . त्यामुळे ऊर्जाविनिमय अस्थिर स्वरूपाचे असते . प्रवाह पात्रामध्ये ज्या ठिकाणी खनन कार्य झालेले आहे किंवा गाळ संचयन झालेले आहे . अशा ठिकाणी काही प्रमाणात स्थिर परिसंस्था आढळून येतात . या परिसंस्थेत जलपर्णी , लव्हाळी , शैवाल , जलवनस्पती यांचे जीवसमूह तर प्लॅक्टन , मासे किंवा उभयचर इत्यादी प्राणी आढळतात . नदीतील प्रदूषणामुळे सद्यस्थितीत या परिसंस्था धोक्यात येउ लागल्या आहेत . जलचर

 ब ) तळी व सरोवर परिसंस्था

या परिसंस्थाना गोड्या पाण्यातील परिसंस्था या नावानेही ओळखले जाते . भूगर्भशास्त्रीयदृष्टया तळी व सरोवराची निर्मिती ही अगदी अलीकडील काळातील आहे . या परिसंस्थेचे स्वरूप हे तळी किंवा सरोवराच्या विस्तारावर अवलंबून असते . मोठ्या सरोवरात परिसंस्थामध्ये विविध स्तर निर्माण होतात . त्यांच्या किनारी भागात गवत व वनस्पती वाढतात . तसेच कृमी , आळी , उभयचर प्राणी आढळतात . तर खोल भागात मासे , खेकडे आणि मृदूकाय प्राणी आढळतात . 

क ) खाडी परिसंस्था खारे पाणी आणि गोडे पाणी यामधील संक्रमण आवस्था म्हणजे खाड़ी होय .

दी आणि समुद्र किंवा आखात व समुद्र या परिसरात खाडी परिसंस्था आढळतात . या परिसंस्था स्वतंत्र व वैशिष्टयेपूर्ण असतात . खाडी प्रदेश उथळ असल्याने अन्नाची उपलब्धता विपुल प्रमाणात होते . तसेच अनुकूल परिस्थितीमुळे अनेक जिवांना जीवन विकासास वाव मिळतो . या परिसंस्थेत चिखलात सुक्ष्म जीव , शैवाल जलनिमग्न गवत आणि पृष्ठभागावर वनस्पतीजन्य आणि प्राणीजन्य प्लॅक्टन याचे स्तर आढळतात . खाडयामध्ये जलप्रदूषण वाढल्यामुळे परिसंस्था लोप पावू लागली आहे . 

ड ) सागर परिसंस्था : जलपरिसंस्थेतील इतर परिसंस्थेपेक्षा सागर परिसंस्था अत्यंत विशाल व वैशिष्ट्यपूर्ण आहेत . या परिसंस्थेमध्ये जलवनस्पती , जलचर प्राणी आणि उभयचर प्राणी आढळतात सुक्ष्मजीव , एकपेशीय जीव , क्लोरोफिलयुक्त वनस्पती , प्राणीजन्य , प्राथमिक जीवांकडून भक्षण केले जातात . या परिसंस्थेत जलवनस्पतीचे विविध प्रकार आढळतात . सागराच्या मध्यभागात मात्र सजिव समूहाचे प्रमाण अत्यल्प असलेले दिसून येते . तसेच मध्यस्तरीय भागातही परिसंस्थेतील जीवाचे प्रमाण कमी आढळते . त्यामानाने सागराचा पृष्ठभाग आणि तळभागात जिवांचे प्रमाण जास्त असते . विविध प्रकारच्या मानवी हस्तक्षेपामुळे सागरी परिसंस्था धोक्यात येऊ लागल्या आहेत . 






No comments:

Post a Comment

  भरती परीकल्पना              सर जेम्स जीन्स या ब्रिटीश शास्त्रज्ञाने 1919 मध्ये पृथ्वीच्या उत्पत्तीचे स्पष्टीकरण देण्यासाठी त्यांचे ' ट...