Settlement Geography
१. सकेंद्रीय कटिबंध सिद्धान्त ( Concentric Zone Theory )
प्रस्तावना:-
१९२० ते ३० या कालखंडात संयुक्त संस्थानामधील समाजशास्त्रज्ञांनी नागरी भूमिउपयोजनावर बरेच मौलिक कार्य केलेले आहे . सन १ ९ २३ मध्ये इ . डब्ल्यू . बर्गेस यांनी नागरी भूमिउपयोजनावर आधारित सकेंद्रीय कटिबंध सिद्धान्त मांडला .
संकल्पना :-
या सिद्धान्ताची थोडक्यात संकल्पना अशी आहे की , कोणत्याही नागरी केंद्राचा विकास केंद्रभागापासून बाहेरच्या बाजूला होत जातो . नागरी केंद्राचा जसजसा विकास होत जातो त्याबरोबर नागरी भूमिउपयोजन हे विविध कार्यांसाठी वापरले जाते . नगराच्या विकासाच्या टप्प्याबरोबर एक - एक वर्तुळ वलयाप्रमाणे ती नागरी वसाहत विस्तारत जाते ; यामुळेच या सिद्धान्ताला सकेंद्रीय कटिबंध सिद्धान्त असे म्हणतात .
( अ ) केंद्रीय व्यावसायिक कटिबंध ( The Central Business District - C.B.D. ) :नगराच्या केंद्रभागी केंद्रीय व्यावसायिक कटिबंध असतो . नगरातील व्यापार , वाहतूक , सामाजिक व नागरी कार्यांचे हे प्रमुख केंद्र असते . या ठिकाणी विविध प्रकारची घाऊक व किरकोळ विक्रीची दुकाने , हॉटेल्स , सिनेमागृहे , म्युझिअम , प्रशासकीय कार्यालयाचे तसेच विविध आर्थिक , सामाजिक व सांस्कृतिक संस्थांची कार्यालये असतात . व्यापारी उलाढालींचे हे प्रमुख केंद्र असते . याला ' डाऊन टाऊन ' ( Down Town ) किंवा ' केंद्रीय व्यापारी कटिबंध ' ( Central Commercial District ) किंवा ' केंद्रीय परिवहन कटिबंध ' असेही म्हणतात .
( ब ) संक्रमण क्षेत्र ( The Zone in
Transition ) :-
केंद्रीय व्यापारी कटिबंधाच्या बाहेरच्या बाजूला संक्रमण क्षेत्र कटिबंध असत . येथे प्रामुख्याने लघुउद्योगधंद्यांचा विकास झालेला असतो . खेड्यांतून व्यवसायाच्या शोधार्थ शहराकडे स्थलांतरित झालेले निर्धन लोक
राहतात , यामुळे समाजातील खालचा दर्जा असणाऱ्या
लोकांची ही प्रमुख वसाहत समजली जाते . ही झोपडपट्टीवजा वसाहत लोक , समाजाने वांछिलेले अपराधी , खुनी , वेश्या , भिकारी , रोगी , तसेच जुगारी लोक , दारू विक्रेते व अनेक दुराचारी लोक या असते . येथे भाडे कमी असल्याने गरीब लोक राहतात . अस्थायी सामाजिक समूह व लघु उद्योगधंदे हे या विभागाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे .
( क ) श्रमिक किंवा कर्मचारी लोकांचे क्षेत्र ( The Zone of
Independent Workingmen's Homes ) :
या विभागामध्ये मुख्यत्वेकरून औद्योगिक कामगार राहतात ; तसेच संक्रमण क्षेत्र सोडून आलेले लोक येथे स्थिरावतात . जेथे श्रमिक काम करतात , त्याच्या जवळपासच्याच प्रदेशात राहणे ते अधिक पसंत करतात ; यामुळे औद्योगिक कामगारांची ही वसाहत समजली जाते . मध्यवर्ती व्यापारी क्षेत्रात काम करणारे काही लोकदेखील या विभागात राहतात . याच विभागात मध्यमवर्गीय लोकदेखील राहतात . हे सर्व लोक | स्थायी वसाहत करून राहिलेले असतात .
(
ड ) उच्चस्तरीय लोकांचे क्षेत्र ( The Zone of Better
Residences ) :
शहरातील गजबजलेल्या वसाहतीला कंटाळून मध्यमवर्गीय व धनिक लोक स्वतंत्र घरे किंवा बंगले बांधून या विभागामध्ये राहतात . येथील लोकांचा राहणीमानाचा दर्जा उच्च असतो . अलग - अलग खोल्यांच्या भव्य वास्तू येथे पाहावयास मिळतात .
(
इ ) अभिगमनकर्त्याचे क्षेत्र ( The Commuter's Zone
) :
ही नागरी वसाहतीची बाहेरची मर्यादा असते . मध्यवर्ती व्यापारी ने केंद्रापासून या वसाहतीत येण्यासाठी वाहनाला वेळ लागतो . अत्यंत श्रीमंत वर्गातील लोक स्वतंत्र बंगले बांधून येथे राहतात . गराच्या अंतर्गत भागात येण्या - जाण्यासाठी ते स्वतःच्या वाहतूक साधनांचा वापर करतात .
सिद्धान्तावरील आक्षेप :-
बर्गेस यांचा हा सिद्धान्त पूर्णपणे स्वीकारण्यात आलेला नाही ; कारण या सिद्धान्तावर अनेक आक्षेप ठी घेण्यात आलेले आहेत . त्यांतील काही आक्षेप खाली दिले आहेत :
( १ ) बऱ्याच नगरांचा आकार ताऱ्याप्रमाणे किंवा चांदणीप्रमाणे असतो . वर्तुळाकार क्वचितच पाहावयास मिळतो .
( २ ) हा सिद्धान्त मांडताना बर्गेस यांनी समान प्राकृतिक रचना अपेक्षिलेली होती ; परंतु प्रत्यक्षात अशी फारच थोडी उदाहरणे आढळतात . त्याचा हा सिद्धान्त पूर्णपणे स्वीकारला नसला तरीदेखील नागरी भूमिउपयोजनाच्या अभ्यासात या सिद्धान्ताने मौलिक भरटाकलेली आहे .
🙏🙏🙏🙏🙏
No comments:
Post a Comment