महाराष्ट्र राज्याची मानचिन्हे
आंबा
हे महाराष्ट्र राज्याचे राज्य फळ आहे Mango Information in Marathi - Ambe Chi Mahiti आंबा या फळाविषयी माहिती आंबा हे भारताचे राष्ट्रीय फळ आहे आणि ते माझ्या सर्वात आवडत्या फळांपैकी एक आहे . आंबा हे उष्णकटिबंधीय फळ आहे , म्हणजेच उष्ण कटिबंधातील उबदार हवामानात ते चांगले वाढते . आंब्याला ' सर्व फळांचा राजा ' असे संबोधले जाते आणि आंबा हे फळ सर्वांना आवडतेच . बहुतांश आंबे अंडाकृती असतात आणि आंब्याच्या त्वचेचा रंग हिरवा , पिवळा ते लाल असतो . आंब्याला एक मोठे बी असते ज्याला आंब्यातील कुई ( mango stone ) म्हणतात आणि हि आंब्याची कुई अखाद्य असते .
आंबा या फळाविषयी काही अनोखी तथ्ये - facts about mango fruit
सुमारे ५००० वर्षांपूर्वी भारतात पहिल्यांदा आंबा पिकवला गेला होता .
• आंबा फळ विविध आकार आणि रंगांमध्ये उपलब्ध आहेत . हे फळ पिवळा , हलका लाल , केशरी आणि हिरवा रंगाचे असते . आंबा हे भारताचे राष्ट्रीय फळ आहे .
• आंब्याची साल आणि पाने शतकांपासून औषधे बनवण्यासाठी वापरली जात आहेत .
• आंबा हे फळ आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे कारण त्यामध्ये व्हिटॅमिन सी , व्हिटॅमिन ए आणि फायबर असतात .
• आंबा हे उष्णकटिबंधीय फळ आहे जे उत्तर पश्चिम म्यानमार , बांगलादेश आणि ईशान्य भारताच्या दरम्यानच्या प्रदेशातून उत्पन्न झाल्याचे मानले जाते .
• आंब्याला ‘ सर्व फळांचा राजा ' असे संबोधले जाते . • आंबा हे फळ काजू आणि पिस्ता प्रजातींशी संबंधित आहे .
शेकरू
राज्य प्राणी ओळखली जाणारी रुबाबदार आणि लाजाळू खार म्हणजे शेकरू याचे प्राणी शास्त्रीय नाव 'राटूपा इंडिका ' असे आहे . ती आर्द्र पानझडी आणि सदाहरीत जंगलात , म्हणजे महाबलेश्वर , भीमाशंकर , अंबोली , ताडोबा अभयारण्यात आणि कोकणात आढळते शेकरूचे वजन दोन ते अडीच किलो असते , लांबी ३ फूट असते . गुंजेसारखे लालभडक डोळे , मिशा , तपकिरी रंग आणि झुबकेदार शेपटामुळे झाडावर आपला तोल सांभाळते , हे वैशिष्ट्य आहे . ही खार बांबू , अर्जुन , जांभुळ आणि रिठा या झाडांवर सर्वांत जास्त घरटे बांधते . शत्रूपासून आपल्या पिल्लांचे संरक्षण करण्यासाठी अनेक झाडांवर घरटे बांधून फक्त एखाद्याच घरट्यात पिल्लांना जन्म देते . वेगवेगळ्या हंगामात येणारी आंबा जांभूळ आणि फणस यांसारखी इतर झाडांची सुमधुर फळे , फुले आणि झाडांची साल शेकरू खाते . त्यामार्फत बीजप्रसार होऊन जंगल वाढण्यास मदत होते . सध्याची परिस्थिती : शेकरू हा भारताच्या पश्चिम घाटातील प्रदेशनिष्ट प्राणी खूप दर्मिळ आहे . खार ज्या झाडावर घरटे बांधते , ती झाडे दैनंदिन वापरासाठी मोठ्या प्रमाणावर तोडण्यात येत आहेत . २०२० मध्ये शेकरूची शिकार केल्यामुळे आरोपींना शिक्षा करण्यात आली होती .
ब्लू मॉरमॉन फुलपाखरू '
मखमली काळ्या पंखावर निळ्या रंगाची छटा म असलेले विलक्षण सुंदर असे ब्लू मॉरमॉन किंवा राणी पाकोळी हे महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू आहे . याचे प्राणीशास्त्रीय नाव पॅपिलिओ पॉलिमॅनेस्टोर आहे . हे भारताच्या पश्चिम घाट आणि श्रीलंकेतील अतिपावसाच्या प्रदेशात आढळते . याच्या पंखाची लांबी १२ ते १५ सेंटिमीटर असते . याचे सुरवंट लिंबूवर्गीय वनस्पती , कवठ , कढीपत्ता आणि बेल याची पाने खाऊन राहतात . या फुलपाखराला २०१५ मध्ये राज्य फुलपाखराचा दर्जा दिला . राज्य फुलपाखरू घोषित करणारे महाराष्ट्र हे भारतातील पहिले राज्य आहे . आकाराने हे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे आणि सुंदर फुलपाखरू आहे .
जारूळ
मेहंदीच्या कुळातील , गुलाबी रंगाच्या पाकळ्यांवर चुणीदार घड्या पडलेले आणि सुंदर झालर असलेले मनमोहक फूल म्हणजे जारूळ . या वृक्षास गावाकडे ' नाणा ' किंवा ' बोंडारा ' देखील म्हणतात . ऊन लागल्यावर याची फुले फिक्कट निळसर रंगाची होतात . याला शास्त्रीय भाषेत लाजेस्ट्रोमिया स्पेसिओसा असे आहे . या वृक्षाच्या फुलास राज्य फुलाचा दर्जा देण्यात आला आहे . याला अनेक गुणधर्मामुळे प्राइड ऑफ इंडिया असे देखील म्हणतात . हा वृक्ष बागेत देखील लावला जातो.
हरियाल राज्य पक्षी म्हणून ओळखला जाणारा हा पक्षी आहे . कबुतराच्या वंशातील हरियाल या पक्षास , ' येलो फुटेड ग्रीन पिजॉन ' असे देखील म्हणतात . याचे प्राणीशास्त्रीय नाव ट्रेरॉन फोइनीकॉपटेरस असे आहे , याला मराठीत पिवळ्या पायाचा हरोळी असे संबोधले जाते . हा पक्षी भारतीय उपखंड , दक्षिण पूर्व आशिया आणि चीन येथे आढळतो .
वैशिष्ट्ये : हरियाल आपले पाय जमिनीवर कधीही ठेवत नाही . शिकाऱ्याची चाहूल लागताच हा पक्षी अनेकदा मरण्याचे नाटक करतो . तो वड , पिंपळ , उंबर , आंबा , पायर या वृक्षांची फळे खातो . या फळांमध्ये असलेल्या ओलसरपणामुळे त्याची तहान भागते , त्यामुळे तो पाणी पिण्यासाठी कधीही जमिनीवर उतरत नाही , असे म्हणतात . शत्रूपासून संरक्षण करण्यासाठी कोतवाल पक्षाच्या घरट्याशेजारी किंवा आपल्या पंखांच्या रंगासारखी पाने असणाऱ्या झाडांवर हा घरटे बांधतो .
सध्याची परिस्थिती : विकासकामांमुळे तोडल्या जाणाऱ्या वड , पिंपळ आणि उंबरवर्गीय वृक्षांची बेसुमार तोड हरियालची संख्या कमी होण्यास कारणीभूत आहे .
कांदळवनातील सफरचंद
महाराष्ट्रातील ७२० किलोमीटर लांबीच्या किनारपट्टीलगत असणाऱ्या खारफुटीच्या जंगलांना कांदळवन असे म्हणतात . कांदळवन म्हणजे खारट पाण्यात वाढणारे जंगल ! याच कांदळवनात वाढणाऱ्या सुवासिक , पांढरी चीप्पी फुलास म्हणजेच सोनेरशिआ अल्बा ' या वनस्पतीला महाराष्ट्राच्या राज्य वृक्षाचा दर्जा देण्यात आला आहे . कांदळवनातल्या वृक्षास राज्य वृक्षाचा दर्जा देणार महाराष्ट्र हे भारतातील पहिले राज्य आहे . ७ ऑगस्ट २०२० रोजी हे मानांकन देण्यात आले . साचलेले पाणी आणि दलदलीमुळे पाण्यातील मुळांना श्वसन करणे अवघड जाते . म्हणूनच या वनस्पतींना पाण्याच्या बाहेर विशिष्ट प्रकारची मूळे असतात , त्यांना निमॅटोफोर असे म्हणतात . या मुळांद्वारे ते हवेतील ऑक्सिजन घेतात .