ग्रामीण - नागरी पट्टा
RURAL - URBAN FRINGE
प्रस्तावना
विसाव्या शतकाच्या मध्यापासून जगातील नागरीकरणाचा वेग वाढला नागरीकरण या बरोबरच शहराचा विस्तार वाढू लागला नागरी केंद्राचा केंद्राच्या परीसिमाच्या बाहेर व्यापार-उद्योग शैक्षणिक संस्था स्थापन होऊन ग्रामीण पट्ट्यातील लोकांच्या आर्थिक व सामाजिक जीवनावर देखील परिणाम होऊ लागला ग्रामीण पट्ट्यातील भूमी उपयोजनावर देखील याचा परिणाम होऊ लागला नागरी जीवनाच्या गरजा भागवण्यासाठी दुग्धव्यवसाय फळे भाजीपाला कुक्कुटपालन यासारखे लागले शहर परिश्रमांच्या बाहेर रस्त्याच्या बाजूला व्यापारी दुकाने निवासी उपनगरे माध्यमिक उपनगरे गोदामे शीतगृहे टिंबर मार्केट विट भट्ट्या कचरा आगारे,पंपिंग स्टेशनची स्थापना झाली नागरी बहुतेक विस्ताराची लक्षणे दिसू लागली यामुळे नागरी भूगोलतज्ञ नगर नियोजन कार समाजशास्त्रज्ञ अर्थशास्त्रज्ञ यांचे लक्ष या दुर्लक्षित संमिश्र पट्ट्याकडे आकर्षिले गेले व या ग्रामीण नागरी पट्ट्याचा अभ्यास होऊ लागला
पार्श्वभूमी
विविध भूगोल तज्ञांनी या सूचनेला पर्यायी शब्द सुचवल्या काहींनी यांचे विभाजन ग्रामीण पट्टा व शहरी पट्टा असे करून या पट्ट्यातील भूमी उपयोजना ची वैशिष्ट्ये सांगितली आहेत. काही ग्रामीण पट्टा, उपनगर, सॅटॅलाइट उपनगर ,सॅटॅलाइट व ग्रामीण क्षेत्र विस्तारत सीमा क्षेत्र नागरी क्षेत्र उपनगरी प्रदेश अंतर्गत सीमा क्षेत्र बाह्य सीमा क्षेत्र पूर्ण सीमा क्षेत्र वर्धा सीमा क्षेत्र अशा विविध नावांनी हा पट्टा संबोधलेले आहे भारतीय भूगोलतज्ञ आर एल सिंग, एम आर चौधरी, के एल सिंग, वर्मा यांनी देखील या यांनी ग्रामीण नागरी पट्ट्या चा अभ्यास करून संकल्पना स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे.
ग्रामीण नागरी पट्टा: व्याख्या
नागरी वसाहती च्या बाह्य सीमेपलीकडे व ग्रामीण वस्त्यांना सुरुवात होण्यापूर्वी जो भाग असतो तेथे नागरी व ग्रामीण व वसाहतीपेक्षा वेगळे संस्कृतिक भूदृश्य निर्माण झालेले दिसते. ग्रामीण व नागरी जीवनाची संमिश्र वैशिष्ट्ये या विभागात आढळून येतात. यालाच ग्राम नगर सीमांत क्षेत्र असेही म्हणतात. हे क्षेत्र नगराच्या सीमेवर असले तरी ते नागरी प्रभावक्षेत्र खाली असते. अनेक भूगोल तज्ञांनी ग्रामीण नागरी पट्ट्याच्या व्याख्या करण्याचा प्रयत्न केला आहे.
1. ग्रामीण नागरी पट्टा म्हणजे नागरी प्रमाणित भूमी उपयोजन व ग्रामीण कृषी क्षेत्र यांच्यामधील संक्रमण विभाग होय -वेहरवेन
2. ग्रामीण नागरी पट्टा हा असा संमिश्र प्रदेश आहे की जेथे ग्रामीण व नागरी भूमी उपयोजना चे चित्र आढळत असून येथे शहरी सेवा मिळणे बंद होते व कृषी भूमि उपयोग प्रभावी ठरू लागतो - ब्लिझार्ड व अँडरसन
3. ग्रामीण कृषि क्षेत्रे व नागरी क्षेत्रे यांच्यातील संक्रमण विभाग म्हणजे ग्रामीण नागरी पट्टा होय
4. ग्रामीण नागरी पट्टा हा असा संक्रमण विभाग आहे की जेथे ग्रामीण व नागरी भूमी उपयोजना ची संमिश्र लक्षणे आढळून येतात.
ग्रामीण नागरी पट्ट्याची वैशिष्ट्ये
1) हा संक्रमण प्रदेश पूर्णपणे नागरी संस्कृतीशी एकरूप झालेला असतो येथे अर्ध नागरी व ग्रामीण स्वरूपाची लक्षणे आढळून येतात येथील लोक अर्थार्जनासाठी नागरिक केंद्राशी संपर्क साधून असतात
2) या क्षेत्रात कचरा आगारे, समशान भूमी, कत्तलखाने जलपूर्ती केंद्रे सांडपाणी केंद्रे गोदामे कोंडवाडे दुय्यम बाजारपेठा असतात.
3) या क्षेत्राचे भूमी उपयोजन सातत्याने बदलत असते.
4) येथील लोक का लोकसंख्या स्थिर नसते संधी मिळताच लोक इतरत्र स्थलांतर करतात.
5) या पट्ट्यातील भूमीचा वापर गोदामे अवजड वाहन दुरुस्ती टिंबर मार्केट विट भट्ट्या कुकूटपालन भाजीपाला शेती दुग्ध व्यवसाय शिक्षण संस्था आरोग्य केंद्रे क्रीडांगणे बाग-बगीचे यासारख्या शहरी पूर घटकासाठी केलेला असतो.
6) नागरी विभागाच्या माननीय या पट्ट्यातील भूमि च्या किमती कमी असतात त्यामुळे येथे निवासी उपग्रह उपनगर स्थापन झालेले असतात.
7) खेड्यातून आलेल्या निर्धन लोकांनी या विभागाचा आश्रय घेतलेला असतो यामुळे येथे झोपडपट्ट्यांची संख्या जास्त असते.
8) या पट्ट्यातील मूळ रहिवासी व नवीन स्थलांतरित लोक यांच्यात काही प्रसंगी सामाजिक ताणतणाव निर्माण होतात.
10) नगराच्या बाह्य परिसीमा पलीकडली पलीकडील हा विभाग असल्याने येथे नियोजनबद्ध वसाहतींना भरपूर वाव असतो परंतु वास्तव चित्र वेगळेच असते.
11) या पट्ट्यात लहान-मोठे उद्योग व औद्योगिक उपनगरे देखील स्थापन झालेले असतात.
ग्रामीण -नागरी पट्टा विभाजन मर्यादा:-
ग्रामीण नागरी सीमाक्षेत्राच्या मर्यादांचा अभ्यास करताना पुढील घटक विचारात घ्यावे लागतात :
( १ ) प्रवासाची वेळ ( २ ) लोकसंख्येची घनता दर चौ.कि.मी. ला ४०० पेक्षा जास्त व्यक्ती ( ३ ) लोकसंख्या वाढ : मागील दशकापेक्षा ४० % वाढ ( ४ ) लिंग प्रमाण दर हजारी ८०० पेक्षा कमी ( ५ ) अकृषी व्यवसायात गुंतलेल्या कामगारांची संख्या ५० % पेक्षा जास्त ( ६ ) बाह्य मर्यादा : स्थानिक बससेवा किंवा लोकल ट्रेन सेवा ( ७ ) अभिगमन लोकसंख्येचे प्रमाण ( ८ ) बांधकाम क्षेत्र ( १ ) लोकसाक्षरता प्रमाण ( १० ) नागरी लोकसंख्येचे प्रमाण ( ११ ) नजीकच्या काळात ग्रामीण भूमिउपयोजनाचे नागरी रूपांतर होण्याची शक्यता ( १२ ) अन्नधान्याखालील पीक क्षेत्राचे व्यापारी पीक क्षेत्रात रूपांतर ( १३ ) भूमीच्या किमती ( १४ ) खाजगी बिल्डर्स , उद्योगपती व व्यापारी यांचा सहभाग ,
ग्रामीण -नागरी पट्ट्याची संरचना ( Structure of Rural and Urban Fringe )
नागरी पट्टा हा प्रत्यक्ष नागरी बांधकाम क्षेत्राच्या बाहच सीमेच्या पलीकडे असतो . या पहचाचे दोन विभाग पडतात
( अ ) अंतर्गत सीमांत क्षेत्र / पट्टा : यालाच ' नागरी पट्टा ' असे म्हणतात . या पट्टयातील भूमिउपयोजनातील बदल जलद गतीने
( ४ ) बाह्य सीमांत क्षेत्र / पट्टा : यालाच ' ग्रामीण पट्टा ' असे म्हणतात , या पट्टधातील भूमिउपयोजनावर ग्रामीण इमारतीचे नवीन बांधकाम सातत्याने सुरू असते . भूमीचा उपयोग विविध कारणांसाठी झालेला असतो .. याचा परिणाम झालेला दिसून येतो . या बाहय भागात विमानतळ , नागरी त्याज्य पदार्थाची विल्हेवाट , कचरा आगारे , ने वीटभट्टया , गुदामे आणि वर उल्लेख केल्याप्रमाणे अनेक कार्यासाठी भूमीचा उपयोग केला जातो .
ग्रामीण नागरी पट्टयाची संरचना पुढीलप्रमाणे असते
( अ ) भूमिउपयोजनाची वैशिष्ट्ये ( Land Use Characteristics ) :
( १ ) भूमिउपयोजनात सातत्याने बदल होत असतो .
( २ ) कृषी क्षेत्रे : शेतजमिनीचा आकार लहान असून सखोल शेती पद्धत अवलंबून पिकांचे उत्पादन घेतले जाते . बाजारा कृषीतील पिकांचे उत्पादन घेतले जाते .
( ३ ) निवासी क्षेत्रे : जलद गतीने विस्तारली जातात .
( ४ ) सेवा आणि सार्वजनिक सुविधा अपुऱ्या असतात .
( ५ ) या विभागातील लोकसंख्या गतिशील असून लोकसंख्येची घनता मध्यम असते .
( ६ ) बांधकाम व्यवसायात सट्टेबाजी प्रवृत्ती दिसून येते .
( ब ) सामाजिक वैशिष्ट्ये ( Social Characteristics ) : आर . इ . पहल यांनी पुढील वैशिष्टये वर्तविली आहेत :
( १ ) अलगता / विभक्तीकरण ( Segregation ) :
या पट्टयात बांधलेली नवीन घरे अलग - अलग असतात . उत्तम व्यावसाि बिल्डरनी बांधलेली घरे अधिक महागडी असतात . उच्च उत्पन्न गटातील लोकांनी ती खरेदी केलेली असतात . येथील म रहिवाशांची घरे या नवीन विकसित झालेल्या निवासी वस्तीपासून अलग किंवा विलग असतात . अनेक वेळा हा ग्रामीण नागरी प ' हरित शेत ' ( Green Field ) म्हणूनही ओळखला जातो . नगारी बांधकाम क्षेत्राच्या बाहेरील हा अविकसित भाग असतो . अविकसित भाग कार्यालये , मुख्यालये , निवासी क्षेत्रे , औद्योगिक वसाहती यांना अधिक अनुकूल असतो . हा हरितपट्टा एक उत्तम स्थिती असून नागरी गडबड , गोंगाटापासून मुक्त असा शांत पट्टा असतो . असा पट्टा खाजगी मालमत्ता म्हणून किंवा शासकी कामासाठी भूमी संपादन कायद्यानुसार घेतला जातो . नागरी नियोजकांनी यासाठी उत्तम नियोजन करणे आवश्यक असते . हा प एखादी शाळा , लघु उद्योगधंदे किंवा निवासी उपनगरासाठी विकसित करता येतो .
( २ ) निवडक आव्रजन स्थलांतर ( Selective Immigation ) :
ग्रामीण - नागरी पट्टा मध्यम उत्पन्न गटातील लोकांना आकर्षित करतो . नगराच्या अंतर्गत भागात किंवा दूर अंतरावर नोकरी , उद्योग करणारे लोक येथे येऊन स्वतंत्र घरे किंवा बंगले बाधून राहतात . नागरी लोकसंख्येतील ही आर्थिकदृष्ट्या सक्षम अशी लोकसंख्या असते . या लोकांचे येथे येऊन राहण्याचे कारण म्हणजे त्यांची आर्थिक स्थिती तसेच किमतीमधील तफावत असते किंवा अशा लोकांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्था , सामाजिक सेवा , सांस्कृतिक सुविधा यांमध्ये सूट अनुदान दिलेली असते .
( ३ ) अभिगमनकर्त्यांचे क्षेत्र ( Commuting Area ) :
ग्रामीण - नागरी पट्टयात राहणारे लोक दररोज आपल्या कामाच्या ठिकाणी जातात . यामधून दुहेरी समस्या निर्माण होते . पहिली समस्या म्हणजे कार्यालयीन वेळेत नगर वाहतूक व्यवस्थेवर अतिरिक्त ताण पडतो . दुसरी समस्या म्हणजे दिवसा खेड्याजवळील हा पट्टा अकार्यक्षम राहिल्याने अशी खेडी केवळ निद्रास्थानेच बनतात .
( ४ ) भौगोलिक व सामाजिक श्रेणीची अवनती ( The Collapse of Geographical and Social Hierarchies ) :
लोकसंख्येचा नगराच्या इतर भागात विशिष्ट सेवांसाठी स्थलांतर ओघ सुरू असतो . ग्रामीण नागरी पट्टयातील या वसाहतीमधील सेवा क्षेत्रत • यामधून लोकसंख्येची गतिशीलता वाढते . लोकसंख्येच्या एकत्रीकरणातून किंवा येणाऱ्या स्थलांतरित लोकसंख्येमुळे पारंपरिक • बदल होऊ लागतात . काही सेवांच्या बाबतीत विशेषीकरण घडून येते . बहुविविध कार्यापिक्षा विशेषीकृत सेवा विकसित होतात . य सामाजिक ग्रामीण जीवनाचे चित्र या संक्रमण प्रदेशात पाहावयास मिळते .
No comments:
Post a Comment