Monday, 24 April 2023

सूर्यमाला ( सूर्यकूल ) ( Solar System )

 सूर्यमाला ( सूर्यकूल ) ( Solar System )

 सूर्यमाला म्हणजे काय ? 

              आकाशात भ्रमण करणाऱ्या अनेक तेजोगोलांनी मिळून आपले विश्व बनले आहे . चांदण्या रात्री आकाशाकडे पाहिल्यास आपणास चमकणारे असंख्य गोल दिसतात . यातील काही गोल स्वयंप्रकाशित असतात . तर काही पर प्रकाशित असतात . जे स्वयंप्रकाशित आहेत . त्यांना तारे ( Stars ) व जे परप्रकाशित आहेत त्यांना ग्रह ( Planets ) म्हणतात.बुध , शुक्र , पृथ्वी , मंगळ , गुरु , शनि , प्रजापती व कुबेर असे ९ ग्रह आहेत . हे सर्व ग्रह सूर्याभोवती प्रदक्षिणा घालीत असतात . प्रत्येक ग्रहाचे सूर्यापासूनचे अंतर सारखे नाही . त्यामुळे प्रत्येक ग्रहाचा सूर्याभोवती फिरण्याचा मार्ग ( कक्षा ) वेगवेगळा आहे . पृथ्वीवरुन तारे व ग्रहाकडे पाहिल्यास ते पूर्वेकडून पश्चिमेकडे सरकताना दिसतात . परंतु प्रत्यक्षात तसे नाही . पृथ्वी स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते . त्याचा परिणाम म्हणून सूर्य , चंद्र , तारे हे पूर्वेकडून पश्चिमेकडे सरकतांना दिसतात . ताऱ्यांना मात्र गती असते असे अनेक खगोल शास्त्रज्ञांचे मत आहे . परंतु तारे पृथ्वीपासून जास्त अंतरावर असल्याने त्यांची गती प्रत्यक्षपणे दिसू शकत नाही .

            ग्रह व ताऱ्या शिवाय विश्वाच्या पोकळीत आणखी लहान लहान गोल आहेत . त्यांना लघुग्रह ( Asteroids ) म्हणतात . हे लघुग्रह देखील पर प्रकाशीत आहेत . तसेच हे देखील इतर ग्रहाप्रमाणे पूर्वेकडून पश्चिमेकडे सरकत असतात . लघुग्रहाशिवाय विश्वाच्या पोकळीत उपग्रह , उल्का , धुमकेतू इत्यादी अनेक गोल आहेत . याप्रकारे ग्रह , लघुग्रह , उपग्रह व इतर अनेक तेजोगोलांनी मिळून सूर्याचे एक कुटूंबच बनले आहे . यालाच सूर्यमाला किंवा सूर्यकूल म्हणतात . अशा अनेक सूर्यमाला विश्वात असल्याचे खगोल शास्त्रज्ञांचे मत आहे .

 सूर्यमालेतील तेजोगोल : - सूर्य ( Sun ) : - विश्वाच्या पोकळीत असणाऱ्या अनेक तेजोगोल यापैकी सूर्य एक होय . सूर्याच्या निर्मिती विषयी शास्त्रज्ञात मतभेद असले तरी सूर्याची निर्मिती अवकाशातील एका प्रचंड तेजोगोलापासून झाली असावी . असे शास्त्रज्ञांचे मत आहे . सूर्याचे अंतरंग द्रवरूप व बाह्य स्वरूप वायुरूप आहे . सूर्याचा व्यास १३ , ९ ०,००० कि.मी. ( पृथ्वीच्या व्यासापेक्षा १० ९ पट जास्त ) आहे . सूर्य हा पृथ्वीपासून १४ कोटी ९ ६ लक्ष कि.मी.अंतरावर आहे . सूर्य हा उष्णतेचा एक गोळा आहे . सूर्याच्या पृष्ठभागाचे तापमान ५५३५० सेंटीग्रेड आहे . पृथ्वीला मिळणारी सर्व उष्णता सूर्यापासूनच मिळते . सूर्यामध्ये प्रचंड गुरुत्वाकर्षण शक्ति आहे . ही शक्ति पृथ्वीच्या शक्तीपेक्षा २८ पट जास्त आहे . यामुळे सूर्यमालेतील सर्व ग्रह आपआपल्या कक्षेत सूर्याभोवती फिरतात . सूर्याचे वजन पृथ्वीच्या वजनापेक्षा ३ लाख ४४ हजार पट अधिक आहे . ( पृथ्वीचे वजन ६५८६ अब्ज टन आहे . ) सूर्य स्थिर आहे असे अनेकांचे मत आहे . परंतु सूर्याला देखील गती आहे असे अलीकडील अनुमानानुसार सिध्द झाले आहे . सूर्य विषुववृत्तावर २५ दिवसात आपल्या आसाभोवती एक फेरी पूर्ण करतो . सूर्याच्या पृष्ठभागावर डाग आहेत . हे सर्वप्रथम गॅलिलीओने स्पष्ट केले . विश्वात असे अनेक सूर्य असावेत असा अंदाज आहे . 


ग्रह ( Planets ) : -

 सूर्यमालेतील ग्रहांची अंतर्ग्रह व बहीह अशा दोन भागात विभागणी केली जाते . 

( अ ) अंतर्ग्रह ( Inner Planets ) : - सूर्याभोवती फिरणाऱ्या ग्रहांपैकी बुध , शुक्र ह्या ग्रहांच्या कक्षा पृथ्वीच्या कक्षेच्या आत आहेत म्हणून या दोन ग्रहांना अंतर्ग्रह म्हणतात . हे ग्रह जवळ असल्याने पृथ्वीवरुन डोळ्यांनी देखील दिसतात . 

( १ ) बुध ( Mercury ) : - सूर्यमालेतील हा सर्वात लहान ग्रह आहे . याचा व्यास ४८०० कि.मी.आहे . बुध हा सूर्यापासून ५ कोटी ८० लाख कि.मी. अंतरावर आहे . हा ग्रह सूर्याला सर्वात जवळ आहे . यास सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास सर्वात कमी म्हणजे ८८ दिवसाचा कालावधी लागतो . बुध स्वतः भोवती ५ ९ दिवसात एक फेरी पूर्ण करतो . सूर्योदयाच्या काही वेळ आधी याचा उदय तसेच सूर्यास्तानंतर थोड्यावेळाने याचा अस्त होतो . सूर्यप्रकाशामुळे दिवसा हा ग्रह डोळ्यांना दिसू शकत नाही . बुधची एक बाजू नेहमी सूर्याकडे असल्याने त्यावर तापमान खूप असते . तर विरुध्द बाजूस तापमान कमी असते . या ग्रहाभोवती वातावरणाचा पातळ थर आहे . या ग्रहाच्या पृष्ठभागावर विविध भूआकार ( पर्वत , डोंगर , दऱ्या , ज्वालामुखी ) आहेत . बुधला एकही उपग्रह नाही . 

( २ ) शुक्र ( Venus ) : - बुध नंतरचा हा ग्रह आहे . इतर ग्रहांपेक्षा जास्त चमकणारा हा ग्रह आहे . काळोख्या रात्री यापासून बराच प्रकाश मिळतो . शुक्र हा सूर्यापासून १० कोटी ८० लाख कि.मी.अंतरावर आहे . हा पृथ्वीला सर्वात जवळ आहे . याचा व्यास १२.३०० कि.मी . आहे . याला स्वतःभोवती फिरण्यास २४० दिवस लागतात . शुक्र स्वतःच्या आसाभोवती उलट दिशन ( पूर्वेकडून पश्चिमेकडे ) फिरतो , त्यामुळे या ग्रहावर सूर्योदय पश्चिमेस व मूस्ति पूर्वेस होतो . या ग्रहास सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास २२४.५ दिवस लागतात . या ग्रहाच्या पृष्ठभाग विषयी माहिती नाही . मात्र या ग्रहावर वातावरण असावे असे शास्त्रज्ञांचे मत आहे ... येथील वातावरणात कार्बनडाय ऑक्साईड कार्बन मोनॉक्साईड हे वायू असावेत . पहाटे हा ग्रह पूर्व आणि सायंकाळी पश्चिम क्षितिजावर दिसतो . सुप प्रमाणे या ग्रहालाही उपग्रह नाहीत . 

3)पृथ्वी ( Earth ) :

      मानवाची वसती असलेला सूर्यमालेतील हा अतिशय महत्त्वाचा ग्रह आहे . पृथ्वीच्या उत्पत्ती विषयी शास्त्रज्ञांची वेगवेगळी मते आहेत . मी पृथ्वीची उत्पत्ती सूर्यापासून झालेली आहे हे सर्वानी मान्य केले आहे . पृथ्वी ही चेंडू प्रमाणे गोल नसून ती नरिंगा प्रमाणे थोडी अंडाकृती आहे . पृथ्वीचा परीघ ३ ९ ८३४ कि.मी. आहे . पृथ्वीचा सरासरी व्यास १२,६६० कि.मी. ( स्थुल मानाने १२७०० कि.मी ) आहे . पृथ्वी व सूर्यामधील अंतर १४ कोटी ९ ६ लाख कि.मी. आहे . पृथ्वीला स्वतः भोवती फिरण्यास २३ तास ५६ मिनीटे ( स्थुल मानाने २४ तास - १ दिवस ) लागतात . तिला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास ३६५ १/४ दिवस ( १ वर्ष ) लागतात . पृथ्वी सभोवती वातावरण आहे . या वातावरणाचा विस्तार भूपृष्ठापासून १६०० २००० कि.मी. पर्यंत आहे यात ऑक्सीजन कार्बनडाय ऑक्साईड , ओझोन , नायट्रोजन , हायड्रोजन इत्यादी वायू तसेच बाष्प व धुलीकण आढळतात . पृथ्वीवर मुबलक पाणी आहे . पृथ्वीचा जवळ जवळ ७१ % भाग जल व्याप्त आहे . म्हणून पृथ्वीला जलग्रह ( Water Planet ) म्हणतात , पाण्यामुळे अंतराळातून पृथ्वी निळसर रंगाची दिसते . 

चंद्र ( Moon ) : - 

           पृथ्वीला चंद्र हा एक उपग्रह आहे . चंद्र हा सूर्यमालेतील सर्वात मोठा उपग्रह आहे . याचा व्यास ३४७६ कि.मी. आहे . चंद्र हा पृथ्वी पासून ३,८४,४०० कि.मी. अंतरावर आहे . चंद्र पृथ्वीभोवती पश्चिमेकडून पुर्वेकडे प्रदक्षिणा घालतो . यास २७ दिवस ७ तास लागतात . परिभ्रमण काळात तो स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करतो . चंद्राचा पृष्ठभाग ओबडधोबड आहे . चंद्राचे क्षेत्रफळ ३६.२६ द.ल.चौ.कि.मी.आहे . अमेरिकेचे निलम्स्ट्राँग व अँडवीन अँड्रीन हे २० जुलै १ ९ ६ ९ रोजी अपोलो ११ च्या सहाय्याने चंद्रावर उतरणारे . जगातले पहिले अंतराळवीर आहेत . 

बहिर्ग्रह ( Outer Planets ) - सूर्याभोवती फिरणाऱ्या काही ग्रहांच्या कक्षा पृथ्वीच्या कक्षेच्या बाहेर आहेत . यात मंगल , गुरु , शनि , प्रजापती , वरुण व कुबेर या ग्रहांचा समावेश होतो . हे सर्व ग्रह ( मंगळ सोडून ) पृथ्वीपासून दूर असल्याने प्रत्यक्ष डोळ्यांना दिसू शकत नाहीत . 

( 4) मंगळ ( Mars ) -

              शुक्र या ग्रह प्रमाणे हा देखील एक चमकणारा ग्रह आहे . याचा रंग लालसर आहे . मंगळ हा सूर्यापासून २२ कोटी ८० लाख कि.मी. अंतरावर आहे . याचा व्यास ६८०० कि.मी.आहे . मंगळाला स्वतःभोवती फिरण्यास २४ तास ३७ मिनीटे लागतात . मंगळ सूर्याभोवती ६८७ दिवसात एक प्रदक्षिणा पूर्ण करतो . मंगळावर प्राणवायू नाही . तसेच मंगळावर तापमान अतिशय कमी आहे . या ग्रहावरील खडकात ओलाव्याचे अंश आढळले आहेत . त्यामुळे या ग्रहावर जीवसृष्टी असावी असा खगोल शास्त्रज्ञांचा अंदाज आहे अमेरिका व रशिया या ग्रहाविषयी माहिती मिळवित आहेत . मंगळास Phobos a Delmos हे दोन उपग्रह आहेत .

 ( 5 ) गुरु ( Jupitor ) : - गुरु हा सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह आहे . याचा व्यास १,४२,१०० कि.मी. इतका आहे . गुरुचा आका पृथ्वीपेक्षा १३१६ पट जास्त आहे . गुरु व सूर्यामधील अंतर ७७ कोटी ८० लाख कि.मी. आहे . गुरुला स्वतःभोवती फिरण्यास १ तास ५० मिनीटे आणि सूर्याभोवती एक प्रदक्षिणा घालण्यास १२ वर्ष लागतात . या ग्रहावर तापमान नसावे . मात्र तेथील वातावरणात हायड्रोजन , नायट्रोजन व मिथेन हे वायू असावेत असे शास्त्रज्ञांचे मत आहे . या ग्रहास लालसर डाग आणि पांढरे पट्टे ( Bands ) आढळतात . या ग्रहाला एकूण २८ उपग्रह आहेत . यात गॅनिमेड , कॅलिस्टो , इयो , व युरोपा है चार मोठे उपग्रह आहेत . गुरु या ग्रहाभोवती एक कडी असावी असा अंदाज आहे . या कढीचा शोध १ ९ ७७ मध्ये लागला .

( 6 ) शनि ( Saturn ) :

             हा देखील एक मोठा ग्रह आहे . याचा शोध गॅलिलीओने इ.स .१६१० मध्ये लावला . याचा व्यास १,१ ९ , ५७०० कि.मी. इतका आहे . शनिचा व्यास पृथ्वीच्या व्यासापेक्षा ७६० पट अधिक आहे . शनि सूर्यापासून १४२ कोटी ६० लाख कि.मी.दूर आहे . शनिला स्वतः भोवती फिरण्यास १० तास २४ मिनीटे लागतात . हा २ ९ वर्ष ६ महिन्यात सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करतो . शनिभोवती वातावरण असून त्यात अमोनीयाचे प्रमाण अधिक आहे . याचा रंग धुरासारखा ( Smoky ) असून त्याच्या भोवती तेजोकणांची कडो आहे . ही कडी शनिभोवती फिरत असते . अलीकडील संशोधनावरुन शनिभोवती ६ कड्या असाव्यात . शनिला सर्वात जास्त ( ३० ) उपग्रह आहेत . यातील टायटन ( Titan ) हा सर्वात मोठा उपग्रह ( व्यास ५२०० कि.मी. ) आहे . 

( 7 ) प्रजापती ( Uranus ) :

           प्रजापती या ग्रहाचा शोध जर्मन शास्त्रज्ञ विल्यम हर्शल यांनी लावला , या शास्त्रज्ञाच्या नावावरुन वास ' हर्शल ' असेही म्हणतात . या ग्रहाचा व्यास ५१,००० कि.मी. इतके आहे . प्रजापती सूर्य यामध्ये २८८ कोटी कि.मी. इतके अंतर आहे . प्रजापती स्वतःभोवती १० तास ४८ मिनीटात एक फेरी पूर्ण करतो . यास सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास ८४ वर्ष १ दिवस इतका कालावधी लागतो . याचा रंग हिरवट ( Greenish ) असून या ग्रहावर दाट वातावरण आहे . यात हायड्रोजन व हेलियम या वायूचे प्रमाण जास्त आहे . याला एरियल , अम्ब्रेल , टायटानिया , ओबेरॉन व मिरान्डा असे ५ उपग्रह आहेत . या ग्रहाभोवती शनि प्रमाणे काही असावी असा खगोल शास्त्रज्ञांचा अंदाज आहे . 

( 8) वरुण ( Neptune ) : -

            वरुण या ग्रहाचा शोध जर्मन शास्त्रज्ञ जॉन गलेन याने इ.स .१८८६ मध्ये लावला , याचा व्यास ४५,००० कि.मी. आणि सूर्यापासून याचे अंतर ४४ ९ कोटी ४० लाख कि.मी. आहे . हा स्वतःच्या व्यासा भोवती १५ तास ४८ मिनीटात एक फेरी पूर्ण करतो . सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास बाला १६४.५ वर्ष लागतात . या ग्रहावरील वातावरणात मिथेन वायु असावा असे शास्त्रज्ञांचे मत आहे . वरुणला २ उपग्रह आहेत . यांची नावे टेट्रॉन ( Tetron ) व निरीड ( Neroid ) अशी आहेत .

 ( 9 ) कुबेर ( Pluto ) :

             कुबेर या ग्रहाचा शोष अमेरिकन शास्त्रज्ञ क्लाईड टोम्बो याने १ ९ ३० मध्ये लावला . सूर्यापासून सर्वात दूर ( ५ ९ ० कोटी कि.मी. ) असलेला हा ग्रह आहे . याचा व्यास ५८०० कि.मी. आहे . हा स्वतःभोवती ६ दिवस १२ तासात एक फेरी पूर्ण करतो . याला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास २४८ वर्ष लागतात . कूचेर सूर्यापासून अतिशय दूर असल्याने या विषयी विशेष माहिती उपलब्ध नाही.याला एकही उपग्रह नाही . 

( 10 ) पॉसिडॉन ( Poseidon ) :

            सूर्यमालेत १० वा ग्रह असल्याचे जोसेफ अँडी या अमेरिकन शास्त्रज्ञाचे मत आहे . या शास्त्रज्ञाला अलीकडे हा ग्रह आढळून आला . त्याने यास ' पॅसिडॉन ' असे नाव दिले आहे . सूर्यमालेतील इतर तेजोगोल- ग्रह , उपग्रह व तारे याशिवाय विश्वाच्या पोकळीत आणखी काही तेजोगोल आहेत . यात लघुग्रह , उल्का , धुमकेतू इत्यादी तेजोगोलाचा समावेश होतो . 

( १ ) लघुग्रह ( Asteroids ) : - 

         विश्वात असलेल्या लहान गोलांनाच लघुग्रह म्हणतात . लघुग्रहांचा व्यास १ ते १००० कि.मी.पर्यंत असतो . पिझी या शास्त्रज्ञाने इ.स .१८०१ मध्ये पहिला लघुग्रह शोधला . त्याचे नाव ' Cores ' असे आहे . इ.स .१८०२ मध्ये त्याला दुसरा लघुग्रह आढळला . त्याचे नाव ' Pallas ' असे आहे . सध्या माहित असलेल्या लघुग्रहांची संख्या २००० इतकी आहे . विश्वात लघुग्रहांची संख्या ५०,००० पर्यंत असावी असा खगोल शास्त्रज्ञाचा अंदाज आहे . मंगळ व गुरु या ग्रहांच्या दरम्यान लघुग्रहांची संख्या जास्त आहे . ग्रहांप्रमाणे लघुग्रह हे सूर्याभोवती प्रदक्षिणा घालतात . १३ फेब्रुवारी २००१ रोजी ' इरास ' या पृथ्वीपासून ३.१३ कोटी कि.मी. अंतरावरील उपग्रहावर ' निथर शूमेकर ' हे अवकाश यान उतरले होते .

 ( २ ) उल्का ( Meteors ) : - 

              कित्येक वेळा आकाशातून प्रकाशाची एखादी रेष चमकून जाते . तेव्हा आपण त्यास तारा तुटला असे म्हणतो . प्रत्यक्षात तो तारा नसून दगडासारखा घन पदार्थाचा गोळा असतो . वातावरणात शिरल्यानंतर घर्षणाने तो जळून जातो . यालाच उल्का म्हणतात . काही उल्का वजनात अतिशय हलक्या असतात . तर काहींचे वजन ५० टनापेक्षा जास्त असते . अशा उल्का भूपृष्ठावर आदळून तेथे मोठे खळगे तयार होतात . महाराष्ट्रात बुलडाणा , जिल्ह्यातील लोणार येथील प्रसिध्द खाऱ्या पाण्याचे सरोवर उल्कापातामुळे निर्माण झाले असे शास्त्रज्ञांचे मत आहे . 

( ३ ) धुमकेतू ( Comets ) :

                धुमकेतू हा शब्द ग्रीक शब्द " Komets oster ' पासून बनला आहे . याचा अर्थ ' Hairy star ' केशयुक्त तारा ' असा होतो . त्याची शेपटी केसाप्रमाणे असते आणि ही २० कोटी कि.मी. पेक्षा लांब असते . सूर्यमालेत असंख्य धुमकेतू असावेत असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे . धुमकेतुच्या कक्षा फार लंब वर्तुळाकार असतात . म्हणून धुमकेतू एकसारखे दिसत नाहीत . त्यांचा काळ ५-१०० वर्षा पर्यंत असतो .

                      धुमकेतू व फायेचा धुमकेतू . धुमकेतूच्या कक्षा दीर्घ लंबाकार असल्याने त्यांच्या प्रदक्षिणेचा कालावधी वेगवेगळा आहे . उदा.अनुकेचा . , धुमकेतू फक्त ३.३ वर्षांनी दिसतो . तर हॅलेचा धुमकेतू दर ७६ वर्षानंतर दिसतो . यापुर्वी तो १ ९ १० व १ ९ ८६ मध्ये दिसला होता . आता . तो २०६२ मध्ये दिसेल . कोहटेकचा धुमकेतु १ ९ ७४ मध्ये दिसला होता . आता तो कित्येक द.ल.वर्ष दिसणार नाही .

 आकाशगंगा ( Galaxy ) : - 

आपली सूर्यमालिका म्हणजे एका ताऱ्याचे ( सूर्य ) एक क्रमबद्ध असे कुटूंब आहे . त्यात ९ ग्रह , अनेक उपग्रह , हजारो लघुग्रह , असंख्य उल्का व धुमकेतु आणि अगणित ताऱ्यांचा समावेश होतो . आपली सूर्यमालिका ही अवकाशाचा ( Space ) एक लहानसा भाग आहे . यालाच ' विश्व ' ( Universe ) म्हणतात . या विश्वातील सूर्य हा अगदी छोटा तारा ( Star ) आहे . सूर्यापेक्षा कितीतरी पटीने मोठे आणखी तारे आहेत . आपली सूर्य मालिका याच्या मध्यभागापासून ३०,००० ते ३३००० प्रकाश वर्षाच्या ( Light Years ) धवल मार्गाच्या ( Milky Way ) एका बाजूला आहे . यालाच ' आकाशगंगा ' ( Galaxy ) म्हणतात .

प्रकाशवर्ष ( Light Years ) :

          अवकाश ( space ) अमर्याद आहे . त्यामुळे त्याची मोजमाप ही भूपृष्ठावरील मोजमापा प्रमाण करता येत नाही . यासाठी प्रकाशवर्ष आणि खगोलशास्त्रीय पध्दतीचा उपयोग केला जातो . ' प्रकाश वर्ष म्हणजे किरणाने एका वर्षात १ . दर सेकंदाला २ ९९ ७ ९ २.५ कि.मी.इतका केलेला प्रवास होय ' . रडार - खगोलशास्त्रीय ( Radar Astronomy ) पध्दतीने विकसीत केलेले हे परिमाण आहे . यास खगोलशास्त्रीय परिमाण ( Astronomical Unit A.U. ) म्हणतात . याद्वारे सूर्य व पृथ्वीमधील सरासरी अंतर मिळते .

 आपल्या सूर्यमालेची वैशिष्ट्ये : 

   १)आपल्या सूर्यमालेच्या केंद्रस्थानी सूर्य असून यातील वस्तुमान सूर्यमालेच्या ९९ .८ % आहे . 

२. ) हायड्रोजन व हेलियम यांचे प्रमाण सूर्याच्या वस्तुमानाच्या सुमारे ९ ८ % आहे . याउलट सूर्यमालेतील ग्रहावर ऑक्सिजन सिलिकॉन , लोह इत्यादीचे प्रमाण अधिक आहे . 

३.)  सूर्यमालेतील सर्व ग्रह सूर्याभोवती एकाच दिशेने प्रदक्षिणा घालतात . यांच्या कक्षा लंबवर्तुळाकार आहेत .

 ४)परिभ्रमणाप्रमाणे ( Revolution ) सर्व ग्रह आपल्या आसाभोवती एकाच दिशेने फिरतात . याला अपवाद शुक्र हा ग्रह आहे . शुक्र हा स्वतःभोवती उलट दिशेने ( पूर्वेकडून पश्चिमेकडे ) फिरतो .

 ५)सूर्यमालेतील ग्रहामधील अंतर हे साधे बोडच्या ( Bode's Law ) नियमाने सांगितले जाते . 


No comments:

Post a Comment

  भरती परीकल्पना              सर जेम्स जीन्स या ब्रिटीश शास्त्रज्ञाने 1919 मध्ये पृथ्वीच्या उत्पत्तीचे स्पष्टीकरण देण्यासाठी त्यांचे ' ट...