Sunday, 16 April 2023

पर्यावरण भूगोलाचे स्वरूप , व्याप्ती व महत्त्व Nature, scope and importance of environmental studies

 

पर्यावरण भूगोलाचे स्वरूप , व्याप्ती व महत्त्व

Nature, scope and importance of environmental studies


हवा, पाणी, जमीन, वनस्पती, पशुपक्षी, कीटक, माणूस, सर्व मिळून पर्यावरण बनत असते. निसर्गामध्ये या सगळयांचे प्रमाण व त्यांची रचना अशा विशिष्ट प्रकारे केलेली असते की, पृथ्वीवर एक संतूलित जीवन चालत राहावे अनेक कोटी वर्षापूर्वी जेव्हा माणूस , पशुपक्षी, कीटक, जंतू पृथ्वीवर जन्माला येऊ लागले तेव्हापासून निसर्गाचे हे चक्र अखंड आणि सुरळीत रितीने चालत आले आहे. ज्याला जितकी आवश्यक आहे. तितके त्याला मिळत असते आणि निसर्ग पुढच्यासाठीही व्यवस्था करत आलेला असतो.

पर्यावरण म्हणजे आपल्या भोवतीचा परिसर असे सामान्यपणे म्हणता येईल. यामध्ये आपल्या भोवताली असणारे सगळेच घटक येत असतात. आपल्या भोवतीचे वृक्ष, पक्षी प्राणी, माणूस, जमीन, पाणी, हवा, जंगल, डोंगर, या सर्वाचे एकत्रित असणे म्हणजे परिसर असतो. पर्यावरणात या सगळयाच घटकांचा एकत्रितपणे विचार करण्याची आवश्यकता असते. कारण हे सगळे घटक एकमेकांवर अवलंबून असतात.

आपल्या भोवतालची प्रत्येक गोष्ट पक्षी, प्राणी, डोंगर, जंगल, शेती, नदी, नाले, गवत, समुद्र, झाडे, आकाश हे सगळे आपण पाहात असतो, त्याप्रमाणे न दिसणारी परंतु वातावरणात असणारी हवा आपल्याला जाणवत असते. पण त्याच्याही पलीकडे जाऊन आपण शोध घेतला तर आपल्याला नव्यानव्या आपण पूर्वी कधीही न पाहिलेल्या गोष्टीही दिसू लागतात. गावातही नदी कुठून वाहात आली आणि ती आपल्या गावातून पुढे कुठे जाते आपण पाहीले तर आपल्याला वेगळी दृश्ये वेगळी माणसे, वेगळे वृक्ष, सगळेच वेगळे दिसू लागते वेगळे म्हणजे नव्याने नेहमी पाहतो त्यापेक्षा वेगळे आपण जातो. हा त्या त्या ठिकाणचा परिसर वेगवेगळा असतो, त्या त्या परिसरातल्या सर्व सजीवांचे एकमेकांशी वैशिष्टयपूर्ण संबंध असतात. आपण त्या परिसरात राहिलो तर आपलाही इतरांशी संबंध येत असतो. असा परस्परसंबंध असलेले तिथले तिथले वातावरण म्हणजेच पर्यावरण - परिसर परस्परसंबंधित असलेले घटक आणि त्यांचे परस्परसंबंध यांचा अभ्यास म्हणजेच परिसर अभ्यास पर्यावरणाचा अभ्यास.

पर्यावरणातील घटक :

पर्यावरणातील मुख्य घटक म्हणजे सूर्य, पाणी जमीन, हवा आणि यांच्या संयोगातून निर्माण झालेली सर्व सजीव सृष्टी.

हवा आणि वायुमंडळ :

हवा ही सजीव सृष्टीच्या दृष्टीने आवश्यक असे जीवरक्षक तत्व आहे. तिच्याशिवाय सजीव जिवंतच राहू शकत नाही. या वायुमंडळात प्राणवायूचा अनंत साठा असतो. स्वच्छ हवा सजीवांच्या आरोग्याला लाभदायक असते.

वायूमंडळ संपूर्ण पृथ्वीभोवती आवरणाच्या रुपात असते सूर्यापासून येणार्‍या अत्यंत उष्ण आणि हानीकारक किरणांपासून हे वायुमंडळाचे आवरण सजीवांचे रक्षणच करीत असते. तसेच या आवरणांमुळे सजीवांचे सौर व अंतरिक्षिय विकिरणांमुळे होणार्‍या हानीपासून रक्षण होत असते.

हे वायूमंडळ पृथ्वीपासून सर्वसाधारणत:दहा हजार किलोमिटर अंतरापर्यत पसरलेले ओ. या वायुमंडळाचे पाच प्रकार आहेत. अधो मंडळ , समोष्ण मंडळ, मध्य मंडळ, आयन मंडळ, आणि बाह्य मंडळ.

हवेचे घटक :

या हवेत आपल्याला जीवनावश्यक असणार्‍या प्राणवायूबरोबरच नायट्रोजन, कार्बनडायऑक्साइड, निऑन, हिलीयम, हायड्रोजन, ओझोन, व धुलीकण, बाष्ण, असे अनेक घटक मिसळलेले असतात. त्यांचे नैसर्गिक प्रमाणे निसर्गचक्राला संतुलित ठेवण्याचे महत्वाचे कार्य करीत असते. या घटकाच्या प्रमाणात बदल झाला तर जीवसृष्टी धोक्यात येते. पक्षी, प्राणी, माणूस यांसारखे सजीव प्राणवायू घेतात. आणि कार्बन डायऑक्साइड सोडतात. तर या उलट वनस्पती कार्बन डायऑक्साइड शोषून घेऊन प्रकाशसंश्लेषण क्रियेतून प्राणवायू सोडतात. त्यामुळे वृक्षतोडीमुळे कार्बन डायऑक्साइडचे हवेतील प्रमाण वाढत जाते. एकीकडे प्राणवायूचे प्रमाण कमी आणि दुसरीकडे कार्बन डायऑक्याइडचे वाढते प्रमाण यांमुळे पृथ्वीचे तापमान वाढण्याचा धोका उत्पन्न होतो.

पाणी :

पाणी म्हणजे जीवन असे आपण म्हणतो ते अक्षरश: खरेच ओ सर्वकाही पाण्यापासूनच निर्माण झाले ओ आणि सर्वकाही पाण्यामुळेच जिवंत असते. प्रत्येक सजीवात-त्यात वनस्पतीही आल्याच - पाण्याचे विशिष्ट प्रमाण असते. मानवाच्या शरीरात ६५ टक्के पाणी असते. हे दोन झाडांच्या सांध्याना ओलसर ठेवीत असते. त्यामुळे एकमेकांवर घासून होणारी त्यांची झिज टाळली जाते. ह्र्दय, मेंदू, अशा महत्वपूर्ण अवयवांच्या भोवती पाण्याने बनलेल्या एका द्रव्याचे कवच त्या अवयवांचे रक्षण करीत असते. हे पाणी शरीरभर विविध भागांत असते, प्राणवायू पोषकतत्वे तसेच कार्बन डायऑक्साइडचे वाहक म्हणून पाणी कार्य करीत असते. तसेच मलमुत्र, घाम या रुपातील शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्याचे कार्यही पाण्याच्या माध्यमातूनच होत असते. शरीरात पाणी पूरेसे नसेल तर शरीर जगू शकत नाही, ते यामुळेच

वनस्पतींनाही पाणी आत्यावश्यक असते आपण पाहातोच. त्यांच्यामध्ये ४० टक्के पाणी असते, काही जलवनस्पतींमध्ये हे प्रमाण ९० टक्के असते अंडयात ७४ टक्के तर काकडीमध्ये ९५ टक्के पाणी असते. पृथ्वीवरील प्रत्येक सजीवांच्या पोषणाला वाढीला, जगण्यासाठी पाणी लागतेच लागते. पाण्याशिवाय जीवन नाही असे म्हणतात ते यामुळेच.

पाण्याचे रुपे :

पाणी घन, द्रव्य आणि वायू या तीन अवस्थेत स्वतंत्र रुपाने राहू शकते. घन रुपाने र्बफ, द्रव रूपाने पाणी आणि वायू रूपाने वाफ या तिन्ही रुपांमध्ये केवळ अवस्थेत बदल सतो पण या तिन्ही रुपांत मूळ पाण्याचे गूणधर्म बदलत नाहीत.

या पृथ्वीवर अनेक स्त्रोतांतून पाणी मिळत असते. अशा या विभिन्न स्त्रोतांतून मिळणार्‍या पाण्याचे गूणधर्मी अर्थातच वेगवेगळे असतात.

पाण्याचे विभिन्न स्रोत व गुणधर्म :

(१) सागरी पाणी: पाणी खारे आणि विविध क्षारांनी युक्त असे असते. ते पिण्याला तसेच शेतीसाठी किंवा उद्योगात उपयोग करण्यास अयोग्य असते.

(२) नदीचे पाणी: पर्वतावरील र्बफ वितळून तयार झालेले पाणी तसेच पावसाचे पाणी विविध झरे, ओहळांमधून मोठया प्रवाहाला येऊन मिळत असते. हा मुख्य प्रवाह म्हणजे नदी. ही जेव्हा सपाट जमिनीवरुन वाहू लागते तेव्हा त्यामध्ये अनेक पदार्थ मिसळत आलेले असतात आणि मिसळण्याची क्रिया सतत चाललेली असते. प्रथम डोंगर माती, नंतर पूढे सपाट जमिनीवरची माती मृत जीवजंतू मानवी वस्ती असलेल्या ठिकाणी मलमूत्र साडपाणी मृतप्राणी कारखान्यातील टाकाऊ रसायनेमिश्र्रित पाणी असे कितीतरी घातक विषारी पदार्थ नदीच्या पाण्यात मिसळत असतात.

नदीचे पाणी पिण्यासाठी शेतीसाठी वीजनिर्मितीसाठी उपयोगात आणले जात असल्याने नदीचे पाणी महत्वाचे असते.

(३) पावसाचे पाणी : समुद्र आणि पृथ्वीच्या पृष्ठभागावरील इतर जलसाठयावरील पाण्याची वाफ होऊन ती वातावरणात जात असते. तिथे र्आद्रता मिळाल्याबरोबर पावसाच्या रुपाने ते पाणी जमिनीवर पडते. सर्वसामान्यपणे पावसाचे पाणी फारसे अशूध्द नसते. मात्र औद्योगिकरणामूळे कारखान्यातून सोडलेल्या विविध विषारी वायूमिश्र्रित हवा ढगांशी तसेच पावसाच्या पाण्याशी मोठया प्रमाणावर संयोग पावल्याने वातावरणातच पाऊस दूषित होतो. हा आम्लपर्जन्य सजीवसृष्टीचे नुकसान करतो. पावसाचे पाणी मोठया प्रमाणावर शेतीसाठी उपयोगात येते ते जमिनीत मुरते त्यामूळे तलाव विहिरींना पाणी मिळते.

(४) झरे ओढे तलाव, तळे : पावसाच्या पाण्याने निर्माण झालेले हे जलस्रोत शेवटी नदीला मिळतात. तळयाचे पाणी निसर्गत:च अडविले गेले असते. तर विहिरी तलाव बांध धरणे या पाणी अडविण्याच्या मानवनिर्मित योजना आहेत. भूगर्भातिल पाणी बाहेर काढून वापरण्यासाठी कूपनलिका या मोठया प्रमाणावर निर्माण झाल्या आहेत.

पाण्याचा उपयोग क्षणोक्षणी, प्रत्येक ठिकाणी केला जात असतो, घरगुती वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वच्छतेसाठी, अन्न शिजविण्यासाठी शेती उद्योग वीजनिर्मिती अशा अनंत प्रकाराने पाण्याचा वापर माणूस करीत असतो. वाढती लोकसंख्या, वाढते उद्योग, वाढत्या गरजा यांमुळे ा वापर वाढत जातो आहे. वापरातूनच गैरवापरही होतो. प्रत्येक ठिकाणचे जलस्रोत आणि त्यांची क्षमता यांचे प्रमाण ठिकठिकाणी कमी अधिक असल्याने कुठे महापूर तर कूठे दुष्काळ, पाण्याची टंचाई अशी विषमता दिसत असते.

भूमी :

भूमी सर्वच सजीव आणि निर्जीव यांचा आधार आहे. सजीवांचा जन्म, विकास आणि अंत हा भूमीशी निगडित असतो. डोंगर -पर्वत नद्यानाले यांनी जमिनीचा आधार लागत असतो. अशा या आधारभूत जमिनीच्या प्रदूषणामुळे सजीव व निर्जीव या सगळयांवरच परिणाम होत असतो.

भूमी हा पृथ्वीचा असा एक भाग आहे की, त्यावर आपण जीवजंतू पशूपक्षी, वनस्पती, वास्तव्य करीत असतात. भूमीच्या आत अनेकविध खनिज पदार्थ, वायू, पाणी यांचा अनंत साठा असतो. हा भूभाग माती, खडक, आणि विरघळून पुन्हा थंड घन झालेल्या विविध घटकांपासून बनलेला आहे. याला स्थलमंडल (लिथोस्पेअर) असे म्हणतात. या भूभागाच्या वरच्या स्तराला भूपटल म्हणतात. पर्यावरणाच्या दृष्टिने भूभाग भूमी, यांसंदर्भात विचार करताना भूम्ीच्या आतल्या स्तराचाही विचार आवश्यक ठरतो. त्याप्रमाणे समुद्र नद्या अशा पाण्याच्या साठयांचा तळाचे भागही भूभाग म्हणून पर्यावरणात विचारात घेणे आवश्यक असते.

भूभागावरची माती ही प्रत्येक ठिकाणी विविध प्रकारांची, विविध गुणधर्माची असते. माती खडक फुटुन, तुटुन तयार होत असते. ही प्रक्रिया पृथ्वीच्या विभिन्न अशा भौतिक रासायनिक आणि जैविक घडामोडीतून होत असते. वेगवेगळया ठिकणचे, वेगवेगळया तर्‍हेचे खनिज कण आणि पाण्याबरोबर वाहात आलेले खडकांचे तुकडे, कण यांपासून तयार झालेले जे पदार्थ मैदानी प्रदेशात पसरतात ती माती, वेगवेगळया ठिकाणची माती, तिच्या निपर्माणकार्यत अंर्तभूत झालेल्या विविध घटकांच्या आधारे वेगवेगळया नावांनी ओळखली जाते. म्हणजे रंगाच्या आधारे काळी माती पांढरी माती आणि चिकण माती भरड माती अशी विविध तर्‍हांनी मातीचे वर्गीकरण केले जाते. विविध गुणधर्मानी युक्त असलेली विविध प्रकारची माती भिन्न, भिन्न प्रकारची पिके घेण्यासाठी उपयोग आणली जाते.

जमिनीच्या वरच्या थरातली माती उत्तम प्रतीची असते. ती निर्माण व्हायला प्रदीर्घ काळ लागतो. ही प्रक्रिया खूपच गुंतागुतीची असते. वरची एक इंच माती तयार होण्यासाठी अनेक वर्षे लागतात. ही उत्तम प्रतीची माती तिचा दुरुपयोग केल्याने, चिती योग्य ती काळजी न घेतल्याने अल्पावधीतच नापीक, कनिष्ठ प्रतीची होत जाते.

भूमी ही अशी एक केंदि्रभूत घटक आहे की, हा घटक जर सुरक्षित राहिला तरच पुढच्या सर्व गोष्टी सुरळीत होऊ शक्तील निवास व्यवस्था, अन्नधान्य उत्पादन, पाणी संकलन वृक्षसंपदा, पर्यावरण संतुलन या सगळयांचा मूलभूत आधार जमीन आहे. पण तिचा निवासव्यवस्था , अन्नधान्य उत्पादन किंवा पाणी साठविण्यासाठी प्रचंड प्रमाणात गैरतर्‍हेने दुरुपयोग केला जात असल्याने आज सारे जग अनेक तर्‍हेच्या दुष्परिणामांना तोंड देत आहे.

भूमीचे प्रकार :

भूमीचे प्रकार आणि त्या आधारे तिचेउपयोग यांचे पुढीलप्रमाणे वर्गीकरण करता येईल.

(१) सर्वसाधारण भूमी:

या प्रकारच्या जमिनीत शेती होत असते ही जमीन देशाचा ठेवा समजली जाते. कारण या जमिनीवर अनेक प्रकारची जंगले आणि त्यांच्या आधारे पशुपक्षी राहात असतात. यावरच पाण्याचे स्रोत असतात.

(२) पाणथळ जमीन :

ज्या जमिनीत पाण्याचे प्रमाण जास्त असते पाण्याचा भूगर्भात निचरा होत नाही. त्यामुळे ती जमीन दलदली जमीन होते. शेतीमध्ये पाण्याचा अतिवापर आणि पाण्याचे मोठे साठे असलेल्या धरणे, तलाव, बांध, अशा ठिकाणांच्या आजूबाजूला सतत पाणी झिरपत राहिल्याने अशा पाणथळ जमीनी निर्माण होतात. अशा जमिनी शेती किंवा घरबांधणीला उपयोगी नसतात. मात्र पक्षी, प्राणी, जलचर, पाणवनस्पतींच्या संवर्धनासाठी उपयोगी पडतात. मत्स्यसंवर्धनासाठी हल्ली या जमिनींचा उपयोग केला जातो.

(३) पडिक जमीन :

जिथे फक्त खडक, मुरुमच आहे. माती, नाही, कारण ती नैसर्गिक कारणांमुळे म्हणा किंवा मानवी कृतीमुळे म्हणा धुपुन गेली आहे. सुपिकता नष्ट झाली आहे किंवा निरुपयोगी झाली आहें, असा भूभाग कोणत्याही तर्‍हेच्या शेतीउत्पादनाला उपयोगी जमीन, म्हणून रुपांतर करण्यासाठी सर्वच देशांत मोठया प्रमाणावर प्रयत्न चालू आहेत.

(४) वाळवंटी जमीन :

या प्रकारच्या जमिनीत मातीचे कण मोठे असतात. त्यांच्यात पाणी जिरविण्याची क्षमता अगदीच कमी असते किंवा नसतेच. त्यामूळे अशा जमिनींमध्ये उत्पादन घेता येत नाही. इथे पाण्याचाही अभाव असतो. हवेत आर्द्रता नसते. त्यामुळे पाऊसही नसतो. यामुळे अशा जमिनींचे रुपांतर हलके हलके वाळवंटात होत असते.

(५) मॅंग्रोव्ह जमीन :

ही जमीन सामान्यपणे समुद्र किनारे, खाडी किनारे या परिसरात असते. या ठिकाणच्या मातीत क्षार ग्रहण करण्याची शक्ती असते. इथे उगविणार्‍या वनस्पतींना मॅंग्रोव्हज म्हणतात. या वनस्पतींमुळे समुद्राचे किनारे सुरक्षित राखण्यास, त्यांची धुप रोखण्यास मदत होते.

पर्यावरणाचे स्वरूप आणि त्यातल्या घटकांची माहिती घेत असताना आतपण, घटकांचे मानवी दृष्टिकोनातून असलेले महत्वही लक्षात घेतले, प्रत्येक सजीवाचा पर्यावरणाशी, पर्यावरणातील विभिन्न घटकांशी असणारा संबंध, या विषयीच्या अभ्यासाला इकॉलॉजीपारिस्थितिकी म्हणतात. या अभ्यासाची वैशिष्टये स्वरूप आणि महत्व समजून घेणे उद्बोधक ठरेल.पर्यावरणात माणसाचे एक महत्वाचे स्थान आहे. बुध्दीच्या जोरावर तो पर्यावरण -संकल्पनेत महत्वाची भूमिका बजावत असतो. त्याचा योग्य किंवा दुरुपयोग करणे हे त्याच्याच हाती असल्याने तो पर्यावरणाच्या केंद्रस्थानी आहे.पर्यावरण म्हणजे काय, त्याचे महत्वाचे घटक, त्यामध्ये असलेलया साधनसंपत्ीचे महत्व यांचा आपण आतापर्यत विचार केला. त्या पार्श्वभूमीवर मानवाचे पर्यावरणातील केंद्रस्थान आणि त्याच्या योग्य अयोग्य पर्यावरणावर झालेला परिणाम यांचा अभ्यास करणे सोपे जाईल.

शिकारी ते शेतकरी अशा क्रमाने मानवाचा विकास होत गेला जीवन अधिकाधिक सूखी व संपन्न करण्यासाठी त्याने बुध्दी आणि कौशल्याचा वापर करायला सुरवात केली. मानवी उत्क्रांती व विकास यांचा इतिहास घडत गेला. त्याने नवनवीन साधने, तंत्रज्ञान शोधून काढले. यातूनच स्वार्थ, सज्ञ्ल्त्;ाा-संपज्ञ्ल्त्;ाी आणि निसर्गावर मात करण्याची महत्वाकांक्षा यांनी मानवाला घेरुन टाकले. अनेक वैज्ञानिक शोध लावत त्याने सुखसोयींची साधने निर्माण केली. वाढत्या लोकसंख्येच्या वाढत्या गरजा भागवण्यासाठी त्याने औद्योगिक क्रांतीचा आधार घेतला. तेव्हापासून निसर्गाचे मूळ स्वरूपच विद्रुप आणि भाषांतरांवरूनरष्ट खंडीत होऊ लागले. जंगले कापली जाऊ लागली. त्यातून शेतजमिनी निर्माण केल्या गेल्या आणि इमारती बांधण्यासाठी त्याच शेतजमिनी नंतर उपयोगात आणल्या जाऊ लागली. कच्चा माल मिळविण्यासाठी, इंधनाची वाढती गरज भागविण्यासाठी जमिनी मैलमैल खोल खोदल्या गेल्या निसर्गसंपत्तीच्या बेसुमार वापरामुळे, तिचा झपाटयाने नाश होऊ लागला. ही प्रकिया गेल्या दोनशे वर्षात अधिकाधिक वेगाने होऊ लागली. या आणि अशा कृत्यामूळे निसर्गाचा नाश तर होऊ लागलाच, पण त्याचबरोबर माणसाची वृत्तीवरवरही बदलत गेली. त्याची हाव अधिकच वाढत गेली. निसर्गाकडे पाहण्याचा त्याचा दृष्टिकोनच बदलला. निसर्गाला आपण अंकित करू शकतो, त्याच्यावर आपण विजय मिळवू शकतो, आपलाच फक्त उपभोग घेण्याचा अधिकार आहे,बाकी इतर पशुपक्षी, वनस्पती, निसर्गसंपज्ञ्ल्त्;ाी, आपल्यासाठीच निर्माण होत असते. अशा कल्पनांनी माणूस आत्मकेंदि्रत होत गेला. इतर घटकांना त्याने स्वार्थापोटी वेठीस धरले एवढेच नाही तर माणसामाणसात देशादेशांमध्ये बळी तो कानपिळी या न्यायाने जीवघेण्या स्पर्धा सुरु झाल्या ज्या विज्ञान तंत्रज्ञानाचा उपयोग करुन त्याने नवनवीन शोध लावले, त्याच ज्ञानाच्चा आधारे त्याने इतर सजीव घटकांबरोबरच इतर दुर्बल माणसांना, देशांना अंकित करण्यासाठी संहारक हत्यारे, शस्त्रे, निर्माण केली यामध्ये वेगाने बदल घडवून अणुबाँबसारखे सारे जगच नष्ट करु शकणारे अस्त्र त्याने तयार करुन जणू निसर्गाविरुध्द युध्द पुकारले.

याचा परिणाम व्हायचा तोच झाला. निसर्गिक साधनसंपत्तीची टंचाई तर भासू लागलीच, पण जीवनाला आवश्यक अशी हवा, जमीन पाणी प्रदूषित होऊ लागली.

(अ) पर्यावरणीय समस्या :

क्षणोक्षणी वाढत जाणारी लोकसंख्या औद्योगिक क्रांतीमुळे शहरी लोकसंख्येत सतत पडत जाणारी भर आणि माणसाची हाव यांमुळे प्रदूषण वाढतच गेले. यामुळे निर्माण होणार्‍या अनेक प्रकारच्या समस्या, दुष्परिणाम यांविषयी पर्यावरण विशषज्ञम्प्;ाम्प्;ा आणि लोकसंख्येचे अभ्यासक डेमोग्राफर्स यांनी फार पूर्वीच इशारा देऊन ठेवला होता. प्रदुषण आणि लोकसंख्या या भस्मासूरांना वेळीच आवरले गेले नाही तर जगात अनेक गंभीर समस्या निर्माण होतील. त्यांच्या या इशार्‍याची गंभीरपणे तातडीने दखल घेण्याची वेळ आली पण त्यासाठी गेल्या पन्नास पंचावन्न वर्षात अस्त्रे यांचा वापर म्हणजे सगळया जीवसृष्टीचाच संहार आहे. हे कळूनसूध्दा आपल्या चूका दुरुस्त करण्यासाठी माणूस तयार होईना, पण जेव्हा जगभर अशा काही घटना घडत गेल्या की त्यामुळे पर्यावरणाची समस्या ही स्थानिक, एखाद्या देशापुरतीच नसून ती जागतिक समस्या आहे, हे माणसाला हळूहळू का होईना पटत गेली. तसेच गेल्या पन्नास पंचावन्न वर्षात पर्यावरणाचे जड्: व्याळ भयानक स्वरूप दाखविण्यार्‍या घटना घडल्या त्यामूळे मानवजात, प्राणिमात्र आणि निसर्ग संपज्ञ्ल्त्;ाी यांची अपरिमित हानी झाली. त्यांचा परिणाम म्हणून अनेक चर्चा, विचारविमर्श परिसंवाद चळवळी अशांची मालिकाच सगळीकडे सुरु झाली त्यातील काही प्रमुख घटनांची इथे थोडक्यात माहिती घेऊ या.

पर्यावरण अभ्यासाची व्याप्ती Scope of Environmental Studies

पर्यावरण अभ्यासाचे क्षेत्र  खूप मोठे आहे याचा अभ्यास फक्त विद्यार्थ्यासाठी नाही तर जगातील प्रत्येक व्यक्ती साठी महत्वपूर्ण आहे त्याचे स्वरूप खालील प्रमाणे

1. पर्यावरणीय अभ्यासामुळे लोकांमध्ये या प्रदेशातील विविध नूतनीकरणीय आणि अपारंपरिक संसाधनांबद्दल जाणून घेण्यासाठी जागरूकता निर्माण होते.  हे भविष्यातील वापरासाठी उपलब्ध असलेल्या विविध संसाधनांची क्षमता, वापर पद्धती आणि शिल्लक यांचे विश्लेषण करते.  

2. पर्यावरणीय अभ्यास आपल्या परिसंस्थेबद्दल, त्याचे कारण आणि परिणाम याबद्दल माहिती देतो.  

3. पर्यावरण अभ्यास जैवविविधतेला संभाव्य धोके आणि पर्यावरणातील वनस्पती, प्राणी आणि सूक्ष्मजीवांच्या प्रजातींबद्दल आवश्यक माहिती मिळवते.  

4. त्याचा अभ्यास नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तींची कारणे आणि परिणाम (पूर, भूकंप, भूस्खलन, चक्रीवादळ इ.), प्रदूषण आणि त्याचे परिणाम कमी करण्यासाठी उपाययोजना समजून घेण्यास सक्षम करतो.  

5. त्याचा अभ्यास पर्यावरणीय समस्यांवरील पर्यायी प्रतिसादांचे मूल्यमापन करण्यास सक्षम करतो.

  6. त्याचा अभ्यास पर्यावरण साक्षर नागरिकांना पृथ्वीच्या संरक्षणासाठी आणि सुधारणेसाठी योग्य निर्णय घेण्यास सक्षम करतो.  

7. त्याच्या अभ्यासामुळे समाजातील अत्याधिक लोकसंख्या, आरोग्य, स्वच्छता इत्यादी समस्या आणि वाईट गोष्टी दूर करण्यात/कमी करण्यासाठी कला, विज्ञान आणि तंत्रज्ञानाची भूमिका समोर येते.  

8. त्याचा अभ्यास विविध पर्यावरणीय समस्यांसाठी योग्य आणि स्वदेशी पर्यावरणास अनुकूल कौशल्ये आणि तंत्रज्ञान ओळखण्यासाठी आणि विकसित करण्यासाठी वातावरण तयार करतो. 

 9. त्याचा अभ्यास नागरिकांना संसाधनांचा शाश्वत वापर करण्याची गरज शिकवतो कारण ही संसाधने आपल्या पूर्वजांकडून तरुण पिढीला त्यांच्या गुणवत्तेत बिघाड न करता वारशाने मिळतात.  


पर्यावरण अभ्यासाचे महत्त्व importance of environmental studies

1. त्याचा अभ्यास सैद्धांतिक ज्ञानाचा वापर आणि पर्यावरणाचे अनेक उपयोग करण्यास सक्षम करतो.

2. पृथ्वीवरील नैसर्गिक संसाधनांची उपलब्धता मर्यादित आहे. 

 3. नैसर्गिक संसाधनांचे शोषण करण्याच्या नवीन मार्गांमध्ये सतत सुधारणा. 

 4. संसाधनांचे अत्याधिक शोषण आणि भविष्यातील पिढ्यांसाठी संसाधने सोडण्याची दृष्टी नाही. 

 5. नैसर्गिक संसाधनांच्या अनियंत्रित शोषणामुळे सर्व प्रकारच्या आणि सर्व स्तरांवर प्रदूषण धोकादायक पातळीपर्यंत पोहोचते. 

 6. वाढत्या प्रदूषणामुळे आणि पर्यावरणाचा ऱ्हास करून मानवासह पृथ्वीवरील सर्व सजीवांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतो.  UN उत्सर्जन अंतर अहवाल 2021 पहा

 7. बिघडत चाललेल्या पर्यावरणाची संयुक्त जबाबदारी स्वीकारण्यासाठी आणि पृथ्वीला भविष्यात राहण्यायोग्य बनवण्यासाठी योग्य ती कार्यवाही सुरू करण्यासाठी. 

 8. जैवविविधता आणि प्रजाती नष्ट होण्यासाठी शिक्षण आणि प्रशिक्षणाची गरज.  वर्ल्ड वाइल्ड लाईफला भेट द्या

 9. उद्योगांसोबतच वाढती शहरी भाग हे प्रदूषणाचे प्रमुख स्रोत आहेत.  

10. संरक्षित क्षेत्रांची संख्या आणि क्षेत्रफळ वाढवणे जेणेकरून किमान या ठिकाणी धोक्यात आलेल्या वन्यजीवांचे संरक्षण करता येईल.

  11. लोकांना पर्यावरणातील गुंतागुंत समजून घेण्यास सक्षम करणे जेणेकरून विकास आणि पर्यावरण सुसंगत असेल.

  12. विद्यार्थ्यांना सामुदायिक कृतीत सहभागी होण्यासाठी आणि विविध पर्यावरणीय प्रकल्पांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रवृत्त करणे. 

13. मानविकी, सामाजिक विज्ञान, जीवशास्त्र आणि भौतिक विज्ञानातील भिन्न दृष्टीकोन एकत्रित करण्याव्यतिरिक्त, नैसर्गिक वातावरणासह मानवी परस्परसंवादाचा अभ्यास करण्यासाठी बहु-विषय दृष्टिकोन स्वीकारणे. 

14. ज्ञान, मूल्ये, दृष्टीकोन आणि जीवनशैलीत बदल घडवून आणण्यासाठी पर्यावरण अभ्यास हे एक महत्त्वाचे साधन आहे जे देशांत आणि देशांमधील स्थिरता निर्माण करण्यासाठी आवश्यक आहे.


No comments:

Post a Comment

  भरती परीकल्पना              सर जेम्स जीन्स या ब्रिटीश शास्त्रज्ञाने 1919 मध्ये पृथ्वीच्या उत्पत्तीचे स्पष्टीकरण देण्यासाठी त्यांचे ' ट...